भडगावी पाच संकलन केंद्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2020 10:02 PM2020-08-29T22:02:19+5:302020-08-29T22:02:29+5:30
मूर्ती विसर्जननासाठी प्रशासानाची तयारी
भडगाव : शहरात प्रशासनाकडून गणेश मुर्ती संकलनासाठी ५ केंद्र तयार करण्यात आले आहे. नागिरकांना स्वत गणेश विसर्जनाची परवानगी नसून प्रशासन सर्व मूर्र्तींचे विधिवत विसर्जन करणार आहे. मंडळांनी नागरिकांनी संकलन केंद्रातच मूर्ती आणून द्याव्यात असे आवाहन करण्यात आले आहे .
सध्या कोरोनाच्या पाश्वभुमीवर गर्दी टाळण्यासाठी प्रशासनाकडुन श्रीचे विसर्जन करण्यासाठी काही नियम व अटी घालण्यात आल्या आहेत. मुर्ती संकलनासाठी भडगाव नगरपरिषदेच्या वतीने पाच ठिकाणी संकलन केंद्र उभारण्यात आले आहेत. त्यामुळे श्री भक्तांनी संकलन केंद्रावरच मुर्ती अपर्ण करून प्रशासनाला सहकार्य करावे असे अवाहन पालिकेचे मुख्याधिकारी विकास नवाळे तसेच पोलीस, महसूल प्रशासनाकडुन करण्यात आले आहे. मुर्ती संकलन केंद्रावर कुठल्याही प्रकारचा विधी ( आरती, पुजा) करता येणार नाही. सर्व विसर्जन विधी घरून करूनच मंडळ व नागरिकांनी यावेत. संकलन केंद्रावर फक्त मुर्ती अर्पण करावी.
दरम्यान ‘चला गर्दी टाळून कोरोना ला हरवूया अन् प्रशासनाला सहकार्य करूया’ असा संदेश देण्यात आला आहे. याबाबत चे जागृती पत्र सोशल मीडियावर टाकून जनजागृती करण्यात आली आहे .
असे आहेत संकलन केंद्र
१)गिरणा नदि पंप हाऊस (वाक रस्ता). २)तळणी परीसर. ३) यशवंतनगर , मारोती मंदिर. ४) शनि मंदिर व श्री स्वामी समर्थ केंद्र परीसर.५) पेठ भागातील मारोती मंदिर