जळगाव : कोरोनामुळे आई-वडिल गमावलेल्या जिल्ह्यातील गरीब आणि गरजु मुला-मुलींचे शैक्षणिक पालकत्व स्विकारण्याची घोषणा भरारी फाऊंडेशन आणि के.के. कॅन्स यांनी केली आहे. तसेच ज्या मुलींचे लग्न ठरले आहे. त्यांच्या लग्नाचा खर्च देखील उचलणार असल्याचे जाहीर केले. आहे.
कोरोनाने दोन्ही पालक गमावलेल्या बालकांचे शैक्षणिक पालकत्व स्विकारण्याची घोषणा भरारी फाऊंडेशन आणि के.के. कॅन्स यांनी केली आहे.तसेच शिरसोली येथील कर्ता पुरुषाचा कोरोनाने बळी गेला. त्यांच्या मागे दोन मुली आणि मुलगा असे कुटुंब आहे. त्यातील २० वर्षांच्या मुलीचे लग्न ठरले आहे. त्यामुळे या मुलीच्या लग्नाची जबाबदारी भरारी फाऊंडेशनने घेतली आहे. त्यांना रजनीकांत कोठारी, बाळासाहेब सुर्यवंशी, अनिल कांकरीया, मुकेश हसवाणी,अनिल भोकरे,रविंद्र लढा,अमर कुकरेजा, किशोर ढाके, व सपन झूनझूनवाला यांचे सहकार्य लाभले आहे. तसेच विधवा महिलांना स्वयंरोजगार देण्याचा भरारी फाऊंडेशनचा मानस असल्याचे दीपक परदेशी यांनी सांगितले.