आॅनलाईन लोकमतकजगाव ता भडगाव, दि.१५ : पाचोरा तालुक्यातील भोरटेक येथील हिंमत भिला पाटील हे गेल्या ४३ वर्षांपासून परिसरातील बालगोपाळांना प्रसाद स्वरुपात बोरांचे वाटप करीत आहेत. वयाच्या ९३ व्या वर्षी देखील त्यांचा गोडवा वाटण्याचा छंद कायम आहे.भोरटेक चे बोरवाले बाबा उर्फ हिंमत भिला पाटील हे कजगाव च्या व्यापारी पेठेत गोड बोरांसाठी प्रसिद्ध आहेत. प्रत्येक व्यक्ती त्यांच्या येण्याची वाट पहातात तर लहान बालक बाबाच्या मार्गा कडे बारकाईने लक्ष ठेवतात.प्रसाद म्हणून बोरांचे वाटपबाबा आले म्हणजे बोर घेण्यासाठी त्यांच्याकडे गर्दी होते. लहान बालक बोराचा फुकटचा प्रसाद मिळतो म्हणून गर्दी करतात. बाबा देखील लहान मुलांना बोर वाटप केल्यानंतर विक्री बाबत विचार करतात. बोर शिल्लक राहिली तर विकायचे अन्यथा बालगोपालाना वाटुन आनंदात माघारी फिरायचे असा हा क्रम बाबा गेल्या ४३ वर्षांपासून सुरु आहे.उच्चशिक्षीत व शंभरावर सदस्य संख्यापाचोरा तालुक्यातील भोरटेक येथील रहिवाशी असलेल्या हिंमत बाबा यांच्या कुटुंबातील बहुतांश सदस्य हे उच्चशिक्षीत आहेत. ९ भाऊ व २ बहिणी असा ११ भाऊ बहिणीच्या परिवाराची सदस्य संख्या १०० पेक्षा जास्त आहे. अनेक सदस्य उच्च शिक्षित अनेक महत्त्वाच्या पदावर विराजमान आहेत. संपूर्ण आयुष्य आपल्याच गावात घालवायचे या निर्धाराने त्यांनी शेती व्यवसायाकडे स्वताला झोकुन दिले. ६ मुले व एक मुलगी या सर्वच्या जबाबदारी यशस्वीपणे सांभाळत चार मुलांना नोकरीस लावले.चंद्रप्रभा, चंद्रकला आणि इंद्रायणीचा गोडवाहिंमत बाबा यांच्या शेतात तीन बोरीची झाडे सुरुवाती पासुन आहे. चंद्रप्रभा,चंद्रकला व इंद्रायणी या तीन प्रकारच्या बोरांची ही झाडे आहेत. अत्यंत चविष्ट व गोड बोर असल्याने याची चांगली देखभाल करण्यात ते व्यस्त असतात. झाडाचे वय वाढले की त्याची कलम करून पुन्हा लावले जाते. ही गोड बोर कजगाव सह परिसरातील नागरिकांच्या चवीला उतरली आहे.
भोरटेकच्या हिंमत बाबाची ४३ वर्षांपासून 'बोरपेरणी'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2018 5:50 PM
कजगाव : बालगोपाळांना प्रसाद म्हणून बोर वाटपाचा छंद कायम
ठळक मुद्देकेवळ बोराचा गोडवा वाटण्यात समाधान४३ वर्षांपासून सुरु आहे बोर वाटपाचा छंदभोरटेक येथील चंद्रप्रभा, चंद्रकला आणि इंद्रायणी बोरांचा गोडवा