यावेळी पालिकेचे मुख्याधिकारी संदीप चिद्रवार, माजी प्रभारी नगराध्यक्ष विजय चौधरी, डॉ. अमोल रावते, डॉ. सूरज भोळे, डॉ. किरण पाटील, डॉ. नीलेश क्षीरसागर, बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिलीप भागवत उपस्थित होते. प्रास्ताविक व परिचय निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाचे जिल्हाध्यक्ष नाना पाटील यांनी केले.
निसर्ग व सामाजिक पर्यावरण मंडळाच्यावतीने प्रा. दिलीप ललवाणी यांनी रक्तदात्यांना सीताफळचे वृक्ष भेट दिली. कार्यक्रमाला नलिन चोरडिया , सुरेंद्रसिंग पाटील यांनी सहकार्य केले.
फोटो ओळी
रक्तदात्यांचे प्रमाणपत्र व वृक्ष भेट देऊन स्वागत करताना सोमनाथ वाघचौरे, संदीप चिद्रावार, विजय चौधरी, डॉ. अमोल रावते, डॉ. किरण पाटील, डॉ. सूरज भोळे, डॉ. नीलेश क्षीरसागर, नवीन चोरडिया आदी.
धरणगाव येथील रक्तदान शिबिरास प्रतिसाद
धरणगाव : लोकमत, विक्रम वाचनालय व ग्रंथालय यांच्यातर्फे आयोजित रक्तदान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.मुकेश सोनवणे, चारुदत्त पाटील, लखन हिरे, महेश अमृतकर, निलेश पाटील, आनंद पाटील, विनय भावे, नगरसेवक गटनेते, कल्पेश महाजन,सुरज वाघरे, मनिष चौधरी, गणेश देवरे, लोकेश ज्वाला, ज्योती महाजन रक्तदान महायज्ञात सहभागी झालेल्यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.
त्यावेळी नायब तहसीलदार प्रथमेश मोहोळ,पोलीस निरीक्षक अंबादास मोरे ,भाजपचे ओबीसी सेल अध्यक्ष संजय महाजन, नगरसेवक कैलास माळी, सुनील चौधरी, भीमराज पाटील, तालुका उपाध्यक्ष चंदन पाटील, विजय वाघमारे, भगीरथ माळी, दीपक वाघमारे, इच्छेश काबरा, भगवान कुंभार, जितेंद्र पाटील, विकास लंबोळे, राहुल पवार यांच्यासह अनेक पदाधिकारी यांनी भेट दिली. तसेच माधवराव गोळवलकर या रक्तपेढी टीमने सहकार्य केले.
चौकट
भडगाव येथे आज रक्तदान शिबिर
भडगाव : लोकमत परिवाराच्यावतीने भडगाव येथे सोमवार दि. १२ रोजी रक्तदान महायज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे. भडगाव ग्रामीण रुग्णालयात सकाळी ९ वाजेपासून रक्तदान शिबिर सुरु होईल.
फोटो ओळी
धरणगाव येथील रक्तदान शिबिरास उपस्थित प्रथमेश मोहोळ, अंबादास मोरे संजय महाजन, कैलास माळी, सुनील चौधरी, भीमराज पाटील, चंदन पाटील आदी.