संतापाच्या भरात रेल्वेने निघालेल्या मुलीस भुसावळ लोहमार्ग पोलिसांनी केले पालकांच्या स्वाधीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2020 03:53 PM2020-10-16T15:53:15+5:302020-10-16T15:53:34+5:30

संतापाच्या भरात रेल्वेने निघालेल्या मुलीस भुसावळ लोहमार्ग पोलिसांनी पालकांच्या स्वाधीन केले

The Bhusawal Railway Police handed over the girl to her parents | संतापाच्या भरात रेल्वेने निघालेल्या मुलीस भुसावळ लोहमार्ग पोलिसांनी केले पालकांच्या स्वाधीन

संतापाच्या भरात रेल्वेने निघालेल्या मुलीस भुसावळ लोहमार्ग पोलिसांनी केले पालकांच्या स्वाधीन

Next

भुसावळ : संतापाच्या भरात रेल्वेने भुसावळकडे निघालेल्या सतना येथील त्या मुलीस लोहमार्ग पोलिसांनी शहानिशा करून पालकांच्या स्वाधीन केले.
मध्य प्रदेशातील सतना येथील तरुणीने संतापात घर सोडल्यानंतर याची माहिती पालकांनी भुसावळ लोहमार्ग पोलिसांना कळवल्यानंतर ०९०९० मुजफ्फरपूर-अहमदाबाद एक्स्प्रेसमधून काजल (२६) ही कोच क्रमांकएस/१, बर्थ -२० वरून प्रवास करीत असताना ताब्यात घेण्यात आले. नंतर तिला पालकांच्या स्वाधीन करण्यात आले.
सतना येथील पालकांनी लोहमार्गच्या महिला पोलीस हवालदार अलका ढवळे यांना तरुणी बाब माहिती व गाडी क्रमांकासह तरुणीचे वर्णन कळवले व त्यानंतर महिला पोलीस कॉन्स्टेबल आशू शेट्टीयार यांच्या मदतीने हवालदार पांडुरंग वसू, सहाय्यक फौजदार किशोर वाघ यांनी १४ रोजी भुसावळ रेल्वेस्थानकावर गाडी आल्यानंतर तरुणीला ताब्यात घेतले. तरुणीचे पालक लोहमार्ग पोलिस ठाण्यात दाखल झाल्यानंतर लोहमार्गचे पोलीस निरीक्षक दिनकर डंबाळे यांच्या उपस्थितीत मुलीला पालकांच्या ताब्यात देण्यात आले.
दरम्यान, याआधी १३ रोजी दिल्ली येथील करोल बाग येथून बेपत्ता झालेल्या मुलीसही लोहमार्ग पोलिसांनी शहानिशा करून पालकाच्या स्वाधीन केले होते.

 

Web Title: The Bhusawal Railway Police handed over the girl to her parents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.