भुसावळ : शहरात जुनी नगरपालिकेच्या बाजूला हॉटेल पंचाली समोरील रस्त्यावर बुधवारी सार्वजनिक जागी सईद शेख अमीर शेख ( वय २८ ) रा. पापानगर हा बेकायदेशिरपणे गावठी कट्टा घेऊन फिरत असल्याची गुप्त माहीती मिळाल्याने बाजार पेठ पोलिसांनी सापळा रचून त्यास अटक केली.पोलिसांनी झडप घालून त्यांच्याकडून गावठी कट्टा हस्तगत केला आहे. यासंदर्भात बाजारपेठ पोलिस ठाण्यात आर्म अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सईद शेख अमीर शेख हा जुन्या नगरपालिका इमारतीसमोर गावठी कट्टा घेऊन फिरत असल्याची माहिती पोलिसांना कळविण्यात आली होती. ही माहिती मिळताच डी . वाय. एस. पी . गजानन राठोड, पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ. युवराज नागरुत, पोलीस नाईक रवींद्र बिºहाडे, किशोर महाजन, यासिन पिंजारी, पो . कॉ . विकास सातदिवे, ईश्वर भालेराव, श्रीकृष्ण देशमुख, प्रशांत परदेशी, अक्षय चव्हाण आदींनी लागलीच घटनास्थळी धाव घेतली. अतिशय हुशारीने सापळा रचुन आरोपी ईद शेख याला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेला १५ हजार रुपये किमतीचा एक लोखडी गावटी कट्टा , मिळुन आला . त्याच्या विरुद्ध बाजार पेठ पोलीस स्टेशनला भाग ६ गु.र.न ५७३/२०१९ आर्म अँक्ट ३/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पो.नाईक रविंद्र बिºहाडे हे करीत आहेत.
भुसावळला पुन्हा गावठी कट्टा पकडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2019 10:21 PM