जळगाव : मिनिस्ट्री ऑफ पेट्रोलियम अॅण्ड नॅचरल गॅस यांच्यावतीने सक्षम-२०२१ (संरक्षण क्षमता महोत्सव) हा कार्यक्रम १६ जानेवारी ते १५ फेब्रुवारी या कालावधीत साजरा करण्यात येत आहे. त्या अंतर्गत जळगाव व भुसावळ शहरात ३१ जानेवारी रोजी पर्यावरण रक्षणासाठीची सायकल रॅली आयोजित करण्यात आली असल्याची माहिती ऑईल मार्केटिंग कंपनीचे जिल्हा समन्वयक अश्विनी यादव यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. याप्रसंगी अक्षय टेंभूर्णे, पालवेन भुतीया, राकेश मिना आदींची उपस्थिती होती.या महोत्सवातंर्गत विद्यार्थ्यांसाठी इंधन संवर्धनावर डीबेट कार्यक्रम घेण्यात येणार आहे. लवकरच याचीही तारीख जाहीर करण्यात येईल. त्याचबरोबर पेट्रोलपंपांवर इंधनाची बचत कशी करता येईल, यावरील मार्गदर्शनपर फलक लावण्यात येणार आहे. पेट्रोल पंपांवरील कर्मचा-यांकडूनही पर्यावरण रक्षणाची प्रतिज्ञा घेतली जाणार असल्याचेही अश्विनी यादव यांनी सांगितले. या महोत्सवातंर्गत इधनाची बचत कशी करावी, कुठे वाहन बंद ठेवावे, वाहनाचे गिअर कसे टाकावे आदींवर जनजागृती केली जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले.