एरंडोल येथे सायकल रॅली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 03:29 PM2021-01-17T15:29:56+5:302021-01-17T15:31:23+5:30
एरंडोल येथे सायकल रॅली काढण्यात आली.
एरंडोल : दि.शं.पाटील महाविद्यालयात ह्यनो व्हेईकल डेह्ण साजरा करण्यात आला. माझी वसुंधरा अभियानांतर्गत वसुंधरा बचाव याबद्दल सर्वांना वसुंधरा बचाव शपथ ग्रहण"करण्यात आली. तसेच सायरल रॅली काढण्यात आली.
हा कार्यक्रम एरंडोल पालिका, महाविद्यालयाचा विद्यार्थी विकास विभाग, एन.एस.एस विभाग, एन.सी.सी विभाग, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ व क्रीडा विभाग यांच्या अंतर्गत व शहरातील जिजामाता विद्यालय, रा.ती. काबरे विद्यालय यातील विद्यार्थी-विद्यार्थिनी, पालिका कर्मचारी प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी त्यांच्या सर्वांच्या समन्वयाने व सहभाग नोंदवत वसुंधरा बचावची शपथ देखील घेण्यात आली.
याच वेळी सायकल रॅलीचे आयोजन देखील करण्यात आले होते. सायकल रॅली ही एरंडोल दिगंबर शंकर पाटील महाविद्यालयातून सुरुवात होऊन बुधवार दरवाजा, भगवा चौक, नागोबा मढी, मार्गे रा.ती काबरे विद्यालयात रॅलीचा समारोप झाला.
वसुंधरा बचाव शपथ कार्यक्रमप्रसंगी पालिकेचे मुख्याधिकारी किरण देशमुख यांनी जल प्रदूषण, वायू प्रदूषण हे कसे कमी करावे याविषयी मार्गदर्शन केले. नगराध्यक्ष रमेशसिंग परदेसी यांनी ह्यजलही जीवन हैह्ण पाण्याचा उपयोग सुयोग्य पद्धतीने केला पाहिजे याविषयी मार्गदर्शन केले. महाविद्यालयाचे अध्यक्ष अमित पाटील यांनी पेट्रोल, डिझेल ह्या नैसर्गिक गोष्टी आहेत व त्या एक दिवशी जास्त उपयोग केल्यामुळे संपतील. आपण पायी किंवा सायकलीचा उपयोग करावा. जेणेकरून प्रदूषण टाळता येईल याविषयी मार्गदर्शन केले.
यावेळी उपनगराध्यक्ष अभिजित पाटील, पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव, प्राचार्य एन.ए. पाटील, समन्वयक डॉ. बडगुजर, विद्यार्थी विकास अधिकारी डॉ.सोपान साळुंखे, प्रा. मीना काळे, एन एस एस अधिकारी प्रा. विजय गाडे, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ केंद्र संयोजक प्रा. नितीन पाटील, प्रा. शर्मिला घाडगे, क्रीडा विभागप्रमुख प्रा.के.जे. वाघ, एन.सी.सी विभाग प्रमुख डॉ. सचिन पाटील, तसेच कनिष्ठ विभागातील सर्व प्राध्यापक शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, जिजामाता माध्यमिक विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, रा.ती. काबरे विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी कार्यक्रमप्रसंगी उपस्थित होते.