जि.प.सदस्यास मारहाणप्रकरणी भाजप आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2020 11:22 PM2020-10-03T23:22:59+5:302020-10-03T23:24:05+5:30
हातेड खुर्द ते भार्ड दरम्यान जि.प.सदस्यास झालेल्या मारहाणप्रकरणी भाजप आक्रमक झाली आहे.
चोपडा : तालुक्यातील हातेड खुर्द ते भार्ड दरम्यान जि.प.सदस्यास झालेल्या मारहाणप्रकरणी भाजप आक्रमक झाली असून, गुंडागर्दी करणाऱ्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी भाजपने केली आहे. दरम्यान, पोलिसांनी सरकारतर्फे फिर्याद देत जि.प. सदस्यासह आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यातील पाच जणांना ताब्यात घेऊन त्यांची जामिनावर मुक्तता केली.
भाजपचे जि.प. सदस्य गजेंद्र पांडुरंग सोनवणे यांना टोळक्याने मारहाण झाल्याची घटना घडली होती. या पार्श्वभूमीवर ३ रोजी भाजप कार्यालयात कार्यकर्त्यांची बैठक झाली. त्यात गुंडागर्दी करणाऱ्यांचा बंदोबस्त पोलिसांनी करावा, अशी मागणी करण्यात आली. भाजपचे तालुकाध्यक्ष पंकज पाटील, माजी सभापती आत्माराम म्हाळके, जिल्हा चिटणीस प्रदीप पाटील, राकेश शांताराम पाटील, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष प्रकाश पाटील, शहराध्यक्ष गजेंद्र जयस्वाल, माजी शहराध्यक्ष राजू शर्मा, पप्पू सोनार, शेतकी संघाचे संचालक हिंमत पाटील, भारत सोनगिरे, विठ्ठल पाटील, शहर उपाध्यक्ष तुषार पाठक यांच्यासह सर्व पदाधिकाºयांनी गुंडागर्दीविरोधात कंबर कसली आहे.
दरम्यान, या मारहाणीत २ रोजी कोणीही गुन्हा दाखल न केल्याने चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनचे हवालदार संजय निंबा येदे यांनीे सरकारतर्फे फिर्याद दिली. रात्री उशिरा आठ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यात भाऊसाहेब हिंमत बिºहाडे रा.हिसाळे, ता.शिरपूर, नंदू छबू शिरसाठ रा.अनवर्दे बुद्रूक, राजेंद्र बाळकृष्ण बोरसे अनवर्दे खुर्द, पंडित हिंमत शिरसाठ, अजय कैलास बाविस्कर, शिवाजी विनायक सैंदाणे तिघेही रा.बुधगाव, ता.चोपडा, बापू महारू कोळी रा.जळोदता.अमळनेर आणि जि.प.सदस्य गजेंद्र पांडुरंग सोनवणे रा. हातेड बुद्रूक यांचा समावेश आहे.
त्यापैकी चोपडा ग्रामीण पोलिसांनी भाऊसाहेब हिंमत बिºहाडे (वय ३५, रा. हिसाळ,े ता.शिरपूर), नंदू छबू शिरसाठ (वय ३४, रा.अनवर्दे, ता.चोपडा), पंडित हिंमत शिरसाठ (वय ४५, रा.बुधगाव, ता.चोपडा), अजय कैलास बाविस्कर (वय २२, रा.बुधगाव, ता.चोपडा),आणि शिवाजी विनायक सैंदाणे (वय २९, रा.बुधगाव, ता.चोपडा) या पाच संशयित आरोपींना ताब्यात घेतले. चोपडा न्यायालयाने त्यांची जामिनावर मुक्तता केली. अधिक तपास चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक संदीप आराक यांच्या मार्गदर्शनाने पोहेका शिवाजी बाविस्कर करीत आहेत.
हाणामारीत वापरला गावठी कट्टा
दरम्यान, पोलिसांनी पाच आरोपी ताब्यात घेत असताना त्यांच्याकडे एक २५ हजार रुपये किमतीचा लोखंडी गावठी कट्टा आणि दोन जिवंत काडतुसे असा ऐवज संशयित आरोपींकडून ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये जप्त करण्यात आला आहे.