चोपड्यात भाजपने वर्धापन दिनी केले ५६ बाटल्या रक्त संकलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2020 08:37 PM2020-04-06T20:37:56+5:302020-04-06T20:40:23+5:30
शहर भाजपने पक्ष कार्यालयात रक्तदान शिबिर आयोजित करून ५६ कार्यकर्त्यांच्या रक्ताच्या बाटल्या संकलित केल्या.
चोपडा, जि.जळगाव : शहर भाजपने पक्ष कार्यालयात रक्तदान शिबिर आयोजित करून ५६ कार्यकर्त्यांच्या रक्ताच्या बाटल्या संकलित केल्या. यावेळी सोशल डिस्टन्सिंग आणि जमावबंदी कायद्याचे पुरेपूर पालन करण्यात आले.
उमर्टीचे माजी सरपंच डॉ.नाना सोनार यांनी कोरोनासंदर्भात प्रतिसाद देत ५,१०० रुपयांचा धनादेश शहराध्यक्ष जायस्वाल यांच्याकडे सुपूर्द केला.
शिबिरासाठी रेड प्लस ब्लड बँकेचे डॉ.अतुल पाटील, भरत गायकवाड, सूरज पाटील, रवींद्र पाटील, दीपक पाटील यांनी सहकार्य केले. प्रामुख्याने उद्योजक बापू महाजन, ज्येष्ठ पत्रकार श्रीकांत नेवे, प्रा.शरद पाटील आदींनी रक्तदान केले.
यावेळी भाजपचे माजी शहराध्यक्ष राजू शर्मा, मुन्ना शर्मा, शहराध्यक्ष गजेंद्र जायस्वाल, सरचिटणीस डॉ.मनोहर बडगुजर, सुनील सोनगिरे, युवा मोर्चा शहराध्यक्ष तुषार पाठक, शेतकी संघाचे माजी व्हाईस प्रेसिडेंट हिंमतराव पाटील, सुतगिरणीच्या संचालिका रंजना नेवे, वंदना पाटील, माधुरी अहिरराव, अनिता नेवे, रंजना मराठे, रत्ना लोहार, आरती माळी, हेमंत जोहरी, सुरेश चौधरी, गोपाल पाटील, योगेश बडगुजर, मोहित भावे, रितेश शिंपी, विशाल भोई, अजय भोई, विशाल भावसार, डॉ.विकी सनेर, बाळू पाटील, धीरज सुराणा, राज घोगरे, विशाल म्हाळके, सागर गुजर, प्रवीण चौधरी, लक्ष्मण माळी, राजेंद्र खैरनार, जोगिंदरसिंग जोहरी, सुनील पाटील, प्रवीण चौधरी व कार्यकर्त्यांनी हजेरी लावली.
तालुक्यात विविध कार्यक्रम
तालुकाध्यक्ष पंकज पाटील यांच्या आवाहनाला कार्यकर्त्यांनी प्रतिसाद देवून भाजप पदाधिकाऱ्यांनी पक्ष ध्वजवंदन केले. सामान्य जनतेशी संवाद साधून कोरोनाच्या लढतीत पंतप्रधान निधीला भरघोस मदत करण्याचे आवाहन केले. त्याला मोठा प्रतिसाददेखील मिळाला.