जळगावकरांना भाजपकडून पुन्हा ‘गाजर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2019 01:19 PM2019-08-04T13:19:45+5:302019-08-04T13:20:39+5:30

विजयकुमार सैतवाल जळगाव : गेल्या वर्षी मनपा निवडणुकीपूर्वी ‘गल्ली ते दिल्ली’ सत्ता असल्याने वर्षभरात शासनाकडून मनपाला १०० कोटी रुपयांचा ...

BJP 'carrots' again for Jalgaon | जळगावकरांना भाजपकडून पुन्हा ‘गाजर’

जळगावकरांना भाजपकडून पुन्हा ‘गाजर’

Next

विजयकुमार सैतवाल
जळगाव : गेल्या वर्षी मनपा निवडणुकीपूर्वी ‘गल्ली ते दिल्ली’ सत्ता असल्याने वर्षभरात शासनाकडून मनपाला १०० कोटी रुपयांचा निधी आणून शहराचा चेहरा मोहरा बदलवू असे आश्वासन जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी दिले होते. मात्र वर्ष उलटले तरी शहराचा चेहरा-मोहरा काही बदलेला नाही. आता पुन्हा आमदार सुरेश भोळे यांनी पुन्हा आकड्यांचा खेळ दाखवित वर्षभरात शहराचा चेहरा बदलविण्याचे गाजर दाखविले आहे.
जळगावकरांच्या त्रासाला जबाबदार कोण?’ या विषयावरील चर्चासत्राच्या दुसऱ्या भागाचे आयोजन शनिवार ३ रोजी दुपारी मायादेवी नगरातील रोटरी भवनात करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी शहरवासीयांनी मनपाच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त करीत शहरवासीयांच्या त्रासाचे खापर मनपावर फोडले. या सोबतच वाहतूक शाखेच्या कारभारामुळे अपघात होत असल्याचाही आरोप करण्यात आला.गेल्या वर्षी मनपा निवडणुकीपूर्वी ‘गल्ली ते दिल्ली’ सत्ता असल्याने वर्षभरात शासनाकडून मनपाला १०० कोटी रुपयांचा निधी आणून शहराचा चेहरा मोहरा बदलवू असे आश्वासन जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी दिले होते. मात्र वर्ष उलटले तरी शहराचा चेहरा-मोहरा काही बदलेला नाही. आमदार सुरेश भोळे यांनी शनिवारी झालेल्या चर्चासत्रात शहरातील विकास कामांसाठी मिळालेल्या विविध योजनांच्या माध्यमातून ८९१ कोटी रुपये प्राप्त झाल्याची माहिती दिली. त्याच वेळी त्यांनी या विकास कामांची कालमर्यादा सांगत वर्षभरात सर्व कामे मार्गी लागून शहराचा चेहरामोहरा बदललेला असेल आश्वासन दिले. असे असले तरी गेल्या वर्षभरात अमृत योजना, रस्त्यांवरील खड्डे, अतिक्रमण,साफसफाईचा ठेका,हुडकोकर्ज,गाळेप्रश्न असे अनेक प्रश्न कायम आहे. त्यामुळे आताही या आश्वासनावर कसा विश्वास ठेवावा, असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत. अमृत योजनेचे काम झाल्यानंतर शहरात भूमीगत गटारींचे काम होऊन त्यानंतर रस्त्यांचे कामे होतील. यात भूमीगत गटारींच्या कामाचे भूमीपूजन आठ दिवसात होईल, असे आमदार म्हणाले. स्वच्छ भारत योजनेंतर्गत ३० कोटींचा निधी मिळाला असून त्यात खरेदी केलेल्या घंटागाड्या आठ दिवसात सुरू होतील व १५ दिवसात शहरात कोठेच कचरा दिसणार नाही, असेही ते म्हणाले. या सोबतच वर्ष-दीड वर्षात शिवाजीनगर उड्डाणपुलाचे काम पूर्ण होईल, आठवडाभरात पोलीस निवासस्थानांचे भूमीपूजन करण्यासह एलईडी दिव्यांच्या समस्या पाहता मक्तेदारच बदलविणार असल्याचे ते म्हणाले. शहराचे सिंगापूर होईल असे नाही, मात्र येथील प्राथमिक गरजा तरी पूर्ण करू, असेही त्यांनी सांगितले. आमदार भोळे यांनी चर्चासत्रात अमृत योजना, भूमीगत गटारी, समांतर रस्ते व इतर कामांसाठी आणलेल्या निधीची आकडेवारी सांगितली. त्यावर आक्षेप घेत तफावत असल्याचा मुद्दा मांडला असता त्यावर प्रिंट मिस्टेक असल्याचे आमदार भोळे म्हणाले. ही सर्व आकडेवारी आपल्याकडे पुराव्यानिशी असून ती खोटी असल्यास आपण केव्हाही राजीनामा देण्यास तयार आहोत, असे आव्हानही आमदारांनी दिले.

Web Title: BJP 'carrots' again for Jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव