खडसेंच्या कार्यक्रमात भाजपचे पदाधिकारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2020 11:05 PM2020-10-30T23:05:38+5:302020-10-30T23:05:44+5:30
मुक्ताई साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ : राष्ट्रवादी अध्यक्षांची भाजपवर जोरदार टीका
मुक्ताईनगर : येथील संत मुक्ताई साखर कारखान्याच्या गळीत हंगाम शुभारंभ कार्यक्रम एकनाथ खडसे यांच्या हस्ते झाला. यावेळी भाजपचे अनेक पदाधिकारीही उपस्थित होते. यामुळे पुन्हा चर्चेचा विषय झाला.
यावेळी नगराध्यक्षा नजमा तडवी, बोदवड बाजार समिती सभापती निवृत्ती पाटील, जि. प. सदस्य वैशाली तायडे , निलेश पाटील, कैलास सरोदे तसेच बोदवड पंचायत समिती सभापती किशोर गायकवाड, पंचायत समिती सदस्य राजेंद्र सावळे व भाजपाचे तालुकाध्यक्ष रामभाऊ पाटील यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या कारखान्यावर खडसेंचे वर्चस्व असल्याने आता हा कारखाना राष्ट्रवादीच्याच ताब्यात आला असे म्हणता येईल, मात्र भाजपचे उपस्थित अनेक पदाधिकारी यांनी भाजप सोडल्याचे जाहीर न करता खडसेंच्या सोबतच ते दिसून लागल्याने नक्की भूमिकाही जाहीर होत नसल्याने चर्चा रंगत आहे.
सदर प्रसंगी माजी मंत्री एकनाथर खडसे व मंदाकिनी खडसे यांच्या हस्ते शुभारंभ झाला. बॉयलर अग्नी प्रदिपन जिल्हा बॅंकेच्या चेअरमन रोहिणी खडसे -खेवलकर यांच्या हस्ते झाला तर अध्यक्षस्थानी कारखान्याचे चेअरमन शिवाजीराव भगवानराव जाधव होते. माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराभी, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संदीप पाटील, चोपड्याचे माजी आमदार कैलास पाटील , विनोद तराळ, आणि सर्व लोकप्रतिनिधी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
यावेळी वनिता गवळे, विनोद पाटील, प्रदीप साळुंखे, गणेश पाटील, ईश्वर राहणे, विधानसभा क्षेत्र प्रमुख विजय सोनार, तालुकाध्यक्ष यु.डी. पाटील, साहेबराव सिंगतकर, विशाल खोले महाराज,शाहिद खान, किशोर चौधरी, वसंत पाटील, कल्याण पाटील, देवेंद्र खेवलकर, आबा माळी,दिपक झाबड,प्रमोद धामोळे , रामदास पाटील, मधुकर राणे,कैलास चौधरी, विनोद कोळी,सईद बागवान,अशोक लाडवंजारी, सुनील माळी, हाजी मुन्ना तेली विलास धायडे, दशरथ कांडेलकर, शिवाजी पाटील,रामभाऊ पाटील,राजू माळी,विश्वनाथ चौधरी, बि सी महाजन, योगेश कोलते, पांडुरंग नाफडे,आदी उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी देवरे, रवी भोसले, पंकज पाटील व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
सर्वांना सहकार्य करण्याचे केले आवाहन
यावेळी एकनाथराव खडसे म्हणाले की, गेले तीस वर्षांपासून मी आमदार आहे मंत्रीही झालो. त्यामुळे आता पदाची अपेक्षा नसून मी मतदारसंघात, जिल्हयात सुरू केलेले, आणि प्रस्तावित केलेले प्रकल्प पूर्ण करण्यासाठी पक्षांतर केले आहे. ते पूर्ण करण्याचा मी पूर्ण प्रयत्न करेल. त्यासाठी आपल्या सर्वांच्या सहकार्याची गरज आहे. तर कारखाना व्यवस्थापनाने नविन ऊस लागवडीकरीता शेतकी विभागामार्फत यावर्षी मागील वर्षाप्रमाणे कारखान्याकडुन एकरी १.५ मे.टन बेणे वसुलप्राप्त पद्धतीने उपलब्ध करुन देण्यात येत असुन सदर योजनेचा कार्यक्षेत्रातील शेतकरी बांधवांनी पुरेपुर लाभ घ्यावा असे आवाहन एकनाथ खडसे यांनी केले.