ओबीसींच्या आरक्षणासाठी भाजपचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 11:43 PM2021-06-03T23:43:00+5:302021-06-03T23:43:31+5:30

ओबीसींचे हक्काचे आरक्षण परत मिळवण्यासाठी भाजपतर्फे गुरुवारी तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

BJP's morcha for reservation of OBCs | ओबीसींच्या आरक्षणासाठी भाजपचा मोर्चा

ओबीसींच्या आरक्षणासाठी भाजपचा मोर्चा

Next
ठळक मुद्देतहसीलदारांना निवेदन : आंदोलन उग्र करण्याचा दिला इशारा

लोकमत न्यूज नेटवर्क

अमळनेर : सरकार ओबीसी समाजाला क्षुल्लक समजत असून मागासवर्गीय आयोगाचे गठण करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या  आदेशाचे पालन करीत नसल्याने ओबीसींचे हक्काचे आरक्षण परत मिळवण्यासाठी भाजपतर्फे गुरुवारी तहसील कार्यालयावर मोर्चा काढून सरकारला निवेदनाद्वारे इशारा देण्यात आला.

सरकारला विरोधकांची जराही किंमत नाहीच. मात्र ओबीसी समाजालादेखील तुम्ही क्षुल्लक समजत आहात.  एवढेच नाही तर सरकारकडून  सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा वारंवार अवमान केला गेला, याचाच फटका ओबीसी समाजाला बसला आहे. गेले पंधरा महिने सरकार फक्त कोर्टात जाऊन पुढची तारीख मागत होते. लवकरात लवकर यावर ठोस कारवाई करा, तसे झाले नाही तर आंदोलनाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही, असा इशारा देण्यात आला.

या वेळी भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष, माजी आमदार स्मिता वाघ, ललिता पाटील, प्रदेश सहसंयोजक व्ही.आर. पाटील, दूध संघ संचालिका भैरवी वाघ, तालुकाध्यक्ष हिरालाल पाटील, शहराध्यक्ष उमेश वाल्हे, माजी सभापती श्याम अहिरे, सरचिटणीस जिजाब पाटील, राकेश पाटील, माजी अध्यक्ष शीतल देशमुख, कृउबा संचालक पराग पाटील, उपाध्यक्ष महेंद्र महाजन, चंद्रकांत कंखरे, महेंद्र पाटील, बापू हिंदुजा, गोकुळ परदेशी, दिलीप साळी, देवा लांडगे, पंकज भोई, योगिराज चव्हाण, समाधान पाटील, झाकीर खान, सौरभ पाटील, निखिल पाटील हजर होते.

Web Title: BJP's morcha for reservation of OBCs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.