५०० जणांचे रक्तनमुने संकलित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:13 AM2021-06-22T04:13:06+5:302021-06-22T04:13:06+5:30

जळगाव : जिल्ह्यातील दहा ठिकाणी आयसीएमआरच्या पथकाकडून सिरो सर्व्हेसाठी रक्तनमुने संकलित करण्यात आले. जिल्हाभरातील ९ ठिकाणी या सर्व्हेसाठी विनाअडचणी ...

Blood samples collected from 500 people | ५०० जणांचे रक्तनमुने संकलित

५०० जणांचे रक्तनमुने संकलित

googlenewsNext

जळगाव : जिल्ह्यातील दहा ठिकाणी आयसीएमआरच्या पथकाकडून सिरो सर्व्हेसाठी रक्तनमुने संकलित करण्यात आले. जिल्हाभरातील ९ ठिकाणी या सर्व्हेसाठी विनाअडचणी रक्तनमुने संकलित झाले असले तरी जळगावातील तांबापुरा भागात मात्र, वैद्यकीय पथकाला कसरत करावी, लागली सायंकाळी उशिरापर्यंत या ठिकाणी नमुने संकलनाचे काम सुरू होत. एकत्रित ५०० रक्तनमुने यात संकलित करण्यात आले आहेत.

हा चौथा सिरो सर्व्हे घेण्यात आला असून यात प्रथमच वयोगटानुसार रक्तनमुने संकलित करण्यात आले आहे. आगामी लाटेत बालकांचे बाधित होण्याचे प्रमाण अधिक असेल त्या दृष्टीने संसर्गाचे प्रमाण व ॲन्टीबॉडीजचे प्रमाण यातून समोर येणार आहे. आधीच्या तीन सिरो सर्व्हेनुसार काही निष्कर्ष समोर आले होते. मात्र, या सिरो सर्व्हेचा अहवाल येण्यास उशीर झाला होता. त्यावेळी वेगळी गावे आयसीएमआरकडून निवडण्यात आली होती. यंदा वेगळ्या गावांची निवड करण्यात आली आहे. यात कुष्ठरोग विभागाचे सहाय्यक संचालक डॉ. इरफान तडवी यांनी याबाबतचे नियोजन केले. शहरातील तांबापुरा भागात, सिंधी कॉलनीचा परिसर अशा ४ ठिकाणी महापालिकेच्या वैद्यकीय पथकासह आयसीएमाअरचे पथकाने रक्तनमुने संकलित केले. सकाळी ९ ते रात्री ८.३० वाजेपर्यंत हे रक्तनमुने संकलनाचे काम सुरू होते. यात प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. राम रावलानी, वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय पाटील, डॉ. विजय घोलप, डॉ. सुजाता परमार, एएनएम अनिता भदाणे, तृप्ती पाटील, ममता बोदडे, शबिरा तडवी, तंत्रज्ञ जीवनदास मेश्राम आदींनी परिश्रम घेतले. यात प्रत्येक भागातून ६ ते ९ वयोगटातील १ मुलगा, ९ ते १८ वयोगटातील २ मुले व १८ वर्षावरील प्रत्येकी ७ जण अशांचे रक्तनमुने घेण्यात आले.

शंभर नमुने आरोग्य कर्मचाऱ्यांचे

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांच्यासह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टर्स तसेच परिचारिका आणि आरोग्य कर्मचारी अशा शंभर जणांचे या ठिकाणाहून रक्तनमुने संकलित करण्यात आले आहे. तिसऱ्या सिरो सर्व्हेत चोपडा येथील शंभर कर्मचाऱ्यांचे नमुने घेण्यात आले होते. त्यात २२ टक्के पॉझिटिव्हिटी आढळली होती.

चेन्नईला होणार तपासणी

संकलीत केलेले रक्तनमुने हे आधी पुणे येथे पाठविण्यात येणार असून त्यानंतर ते चेन्नई येथे प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार आहे. त्या ठिकाणी तपासणी होऊन साधारण महिनाभरात याचा अहवाल समोर येणार आहे. त्यानुसार संसर्गाचे प्रमाण समजून पुढील धोरण ठरविता येणार आहे.

वयोगटानुसार रक्तनमुने संकलन

६ ते ९ वयोगट : ४०

९ ते १८ वयोगट : ८०

१८ वर्षावरील पुढील : २८०

जीएमसी आरोग्य कर्मचारी : १००

Web Title: Blood samples collected from 500 people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.