‘आमचा बंडू अतिशय आतल्या गाठीचा आहे, घरी काही काही म्हणून सांगणार नाही. वर्गात काय शिकविले सांगणार नाही, मार्कस कळाले तरी घरी सांगणार नाही, मारामाºया करून आला तरी सांगणार नाही, शेजारच्या सुहासने सांगितले तरच मला कळते. ‘डॉक्टर, का बरं हा असा वागत असेल?’ बंडूची आई बंडूची तक्रार करता करता काकुळतीला येऊन विचारत होती. ‘शेजारचा सुहास तुम्हाला का बरे सांगतो?’ या माझ्या प्रश्नावर त्या उत्तरल्या, ‘मुलं स्वत: होऊन काही सांगतात का डॉक्टर? आधी मीच विचारायची त्याला खोदून खोदून, आता तो स्वत: होऊनच सांगतो. परवा बंडूला गणिताचा पेपर मिळाला. चक्क तीन गुण होते दहापैकी. पण घरी सांगितले नाही. सुहासकडूनच कळाले.’ असा संताप झाला म्हणून सांगू? घरी येऊन त्याला चांगला चोपला. तेव्हा कुठे त्याने पेपर दाखवला.’ बंडूची आईच नाही तर असे कित्येक पालक मुलांच्या घरी काहीही न सांगण्याच्या समस्येने त्रस्त असतात. मुलगा घरी काही सांगत नसेल तेव्हा पालकांनीही काही खबरदारी घ्यायला हवी.मुलाचा बौद्धिक विकास : मुलगा घरी का सांगत नाही या कारणाचा शोध घ्यायला हवा. त्यात मुलावर काही ताण आहे का? त्याचा आपल्यावर विश्वास नाही का? अथवा पालक म्हणून आपले काही चुकते का? ते निरपेक्षपणे शोधायला हवे.मुलाची अति चंचलता : त्यावर उपाय म्हणून शाळेत, शिकवणीच्या ठिकाणी वारंवार चौकशा करू नयेत. त्याने तेथील शिक्षकांच्या हातात आयते कोलीत मिळते.मुलाची ‘स्व’ मग्नता : मुलाच्या मित्रांना वारंवार विचारून वा त्यांनी दिलेल्या माहितीवर विसंबून मुलाला शिक्षा करू नये. उलट अशी माहिती घेणे टाळावे.मुलाची अध्ययन अक्षमतेची समस्या मुलावर अधिक भरवसा दाखवावा व तो कसा वाढेल ते पाहावे.मुलांतील भावनिक समस्या : मुलगा काही सांगत असेल तर त्यात व्यत्यय न आणता लक्षपूर्वक ऐकून घ्यावे. त्याचे म्हणणे पटले नाही तरी तसे न दाखवता, त्याला टोमणा न मारता, वा उपदेश न करता त्याचा हेतू समजून घ्यावा.मुलांतील भावनिक समस्या : त्यावर सूचना द्यावयाची असेल तर घाई न करता योग्य वेळ पाहून योग्य शब्दात आपले म्हणणे मांडावे. या सूत्रीचा वापर केला तर मुलगा पालकांजवळ यायला लागतो व गोष्टी सांगायला लागतो. अधिकच जोमाचा प्रयत्न केला तर मन मोकळा वागायला लागतो.- डॉ. नीरज देव
मुलगा घरी काही सांगतच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 1:01 PM