मुलाला शिकवणीला सोडले अन् लांबविली महिलेच्या गळ्यातील पोत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2017 10:06 PM2017-11-07T22:06:35+5:302017-11-07T22:07:32+5:30
मेहरुण तलावाजवळील लेक रेसीडेन्सी अपार्टमेंट येथे मुलाला क्लासला सोडून बाहेर थांबलेल्या सपना मधुसुदन पवार (रा.पोलीस कॉलनी, एमआयडीसी जळगाव) या महिलेच्या गळ्यातील एक तोळ्याची सोन्याची मंगळपोत दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी धूमस्टाईलने पळवून नेल्याची घटना मंगळवारी दुपारी चार वाजता घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आॅनलाईन लोकमत
जळगाव दि,७: मेहरुण तलावाजवळील लेक रेसीडेन्सी अपार्टमेंट येथे मुलाला क्लासला सोडून बाहेर थांबलेल्या सपना मधुसुदन पवार (रा.पोलीस कॉलनी, एमआयडीसी जळगाव) या महिलेच्या गळ्यातील एक तोळ्याची सोन्याची मंगळपोत दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी धूमस्टाईलने पळवून नेल्याची घटना मंगळवारी दुपारी चार वाजता घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एमआयडीसी परिसरातील पोलीस कॉलनी येथील सपना मधुसुदन पवार या नेहमीप्रमाणे मंगळवारी मुलाला क्लासला सोडण्यासाठी मेहरुण तलाव भागातील लेक रेसिडेन्सी अपार्टमेंट आल्या होत्या. क्लास संपेपर्यंत त्या अपार्टमेंटच्या बाहेरच थांबतात, मात्र आज त्या तलावकडे फिरायला गेल्या. तेथून परत अपार्टमेंटकडे येत असताना काळ्या रंगाच्या दुचाकीवरुन आलेल्या दोघांपैकी मागे बसलेल्या चोरट्याने पवार यांच्या गळ्यातील मंगळपोत ओढली. त्यात पोत तुटल्यामुळे काही मणी जमिनीवर पडले.
नागरिकांनी केला पाठलाग
मंगळपोत ओढून पलायन केल्यानंतर सपना पवार यांनी आरडाओरड केली. त्यामुळे परिसरातील लोकांनी दुचाकीस्वार ज्या दिशेने गेले त्या दिशेने पाठलाग केला. परंतु उपयोग झाला नाही. दोघं चोरट्यांनी लाल व पांढºया रंगाचे कपडे परिधान केले होते. एमआयडीसी पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर उपनिरीक्षक योगेश शिंदे, रामकृष्ण पाटील, शरद भालेराव, हेमंत कळसकर, जितेंद्र राजपूत यांनी घटनास्थळाची पाहणी केली. रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेज तपासून त्या आधारावर चोरट्यांचा पोलिसांनी शोध घेतला. तांबापुरा व कंजरवाडा या भागातही पोलिसांनी चोरट्यांची शोध घेतला, मात्र त्यात अपयश आले.