कढोलीतून नववधू दुसऱ्याच दिवशी रफुचक्कर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2020 08:14 PM2020-10-12T20:14:57+5:302020-10-12T20:16:42+5:30
बोहल्यावर चढल्यानंतर दुसºयाच दिवशी नववधू रफुचक्कर झाल्याचा प्रकार येथील युवकाच्या बाबतीत घडला आहे.
रतन अडकमोल
कढोली, ता.एरंडोल : बोहल्यावर चढल्यानंतर दुसºयाच दिवशी नववधू रफुचक्कर झाल्याचा प्रकार येथील युवकाच्या बाबतीत घडला आहे. असे एक, दोनदा नव्हे तर चक्क चौथ्यांदा घडले आहे. यासाठी या युवकाने पाच-सहा वर्षात दलालांमार्फत तब्बल तीन लाख ७० हजार रुपये मोजले आहेत. स्वप्नील जगन्नाथ बडगुजर (३०) असे या युवकाचे नाव आहे.
विवाहासाठी समाजात मुली मिळत नसल्याने किंवा मुलींकडील पालकांच्या अपेक्षा वाढल्याने ग्रामीण भागात विवाहासाठी मुली मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे समाजात परजिल्ह्यातून, अनाथाश्रम किंवा गरीब घरातील मुली करण्याचा कल वाढला आहे. त्यातच दलालगिरी वाढल्याने फसवेगिरीचेही प्रकार समोर येत आहे. असेच काहीसे येथील युवकाबरोबर घडले आहे-ते एक, दोनदा नव्हे तर तब्बल चार वेळा. येथील युवक स्वप्नील बडगुजर याची गेल्या पाच-सहा वर्षात दलालांमार्फत तीन लाख ७० हजार रुपयात फसवणूक झाल्याची माहिती समोर येत आहे.
चौथे लग्न जळगाव येथील महिला दलालामार्फत बुलढाणा येथील महिलेशी एक लाख रुपये देण्याच्या अटीवर २० सप्टेंबर रोजी कांताई धरणाजवळ प्रसिद्ध नागाई जोगाई मंदिरात लावण्यात आले. व्याजाने ७० हजार रुपये काढून दलालाला दिले व बाकी राहिलेले ३० हजार रुपये दिवाळीनंतर देण्याच्या बोलीवर ठरल्याचे या युवकाने सांगितले. नववधू लग्नानंतर अवघे दोनच दिवस थांबून तिसºया दिवशी रफूचक्कर झाल्याचे लक्षात आल्याने पोलिसात तक्रार देणार आहे.
याआधी या युवकाची शहापूर (बºहाणपूर), घोटी (नाशिक), औरंगाबाद व बुलढाणा येथील युवतींनी लग्न लावले. परंतु त्या रफूचक्कर झाल्या आहेत. त्यांचा तपास लागलेला नाही, असे या युवकाचे म्हणणे आहे.