CoronaVirus News : 'या' छोट्याशा देशाची कमाल! प्रत्येकाला मिळाली कोरोना लस; ठरला लसीकरण पूर्ण करणारा जगातील पहिलाच देश

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2021 09:01 AM2021-03-20T09:01:07+5:302021-03-20T16:25:11+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी विविध उपाय केले जात आहेत. काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात लसीकरणाला सुरुवात झाली आहे.

britain gibraltar becomes first nation to fully vaccinate its entire adult population against covid 19 | CoronaVirus News : 'या' छोट्याशा देशाची कमाल! प्रत्येकाला मिळाली कोरोना लस; ठरला लसीकरण पूर्ण करणारा जगातील पहिलाच देश

CoronaVirus News : 'या' छोट्याशा देशाची कमाल! प्रत्येकाला मिळाली कोरोना लस; ठरला लसीकरण पूर्ण करणारा जगातील पहिलाच देश

Next

जगभरातील सर्वच देश हे कोरोनाच्या महाभयंकर संकटाचा सामना करत आहेत. प्रगत देशही कोरोनापुढे हतबल झाले आहे. अनेक देशांतील परिस्थिती गंभीर झाली असून एकूण रुग्णांची संख्या ही तब्बल 11 कोटींवर पोहोचली आहे. तर लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी विविध उपाय केले जात आहेत. काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात लसीकरणाला सुरुवात झाली आहे. याच दरम्यान एका छोट्या देशाने कमाल केली आहे. आपल्या देशातील सर्व नागरिकांना कोरोनाची लस दिली आहे. लसीकरण पूर्ण करणारा तो जगातील पहिलाच देश ठरला आहे. 

ब्रिटनचे आरोग्यमंत्री मॅट हॅनकॉक यांनी गुरुवारी दिलेल्या माहितीनुसार, जिब्राल्टरमधील सर्व नागरिकांचे लसीकरण पूर्ण झालं आहे. देशातील सर्व पात्र व्यक्तींना लसीचा डोस देण्यात आला आहे. जिब्राल्टरची लोकसंख्या जवळपास 33,000 आहे. या ठिकाणी कोरोनाचे चार हजार 263 रुग्ण आढळून आले होते. तर देशातील 94 जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला. मॅट हॅनकॉक यांनी हाऊस ऑफ कॉमन्समध्ये यासंदर्भात माहिती देताना "मला ही गोष्ट सांगताना खूप आनंद होत आहे की काल (बुधवारी) जिब्राल्टर जगातील पहिला असा देश ठरला आहे ज्या आपल्या सर्व नागरिकांचे लसीकरण पूर्ण केलं आहे" असं म्हटलं आहे.

"लसीकरणाची मोहीम यशस्वीपणे राबवण्यामध्ये सर्व देशांचं मोलाचं सहकार्य"

हॅनकॉक यांनी कोरोना संकटाच्या प्रसंगी जिब्राल्टरच्या नागरिकांनी दाखवलेला संयम आणि साहसाचं मी कौतुक करतो असं म्हणत जिब्राल्टरच्या नागरिकांचं भरभरून कौतुक केलं. "ब्रिटीश देशांच्या समुहामध्ये असणाऱ्या या देशातील लसीकरणाची मोहीम यशस्वीपणे राबवण्यामध्ये सर्व देशांमधील सहकार्य मोलाचं ठरलं" असंही सांगितलं. जिब्राल्टरचे प्रमुख फॅबियन पिकार्डो यांनी लसीकरणासाठी यूनायटेड किंग्डम सरकारचे आभार मानले. पीपीई कीट, लसी आणि चाचण्यांसाठी लागणारी सर्व आर्थिक मदत ब्रिटनने आम्हाला केल्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत असं पिकार्डो म्हणाले. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

कोरोनाचा धोका दिवसागणिक वाढत आहे. फ्रान्समध्ये तिसरी लाट आली आहे. फ्रान्समध्ये कोरोनाने रौद्ररुप धारण केलं असून पॅरिसमध्ये पुन्हा एकदा एक महिन्याच्या लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशातील 15 भागांमध्ये शुक्रवारी मध्यरात्रीपासून लॉकडाऊन लागू होणार आहे. पंतप्रधान जीन कॅस्टेक्स यांनी याआधी लागू झालेल्या लॉकडाऊनपेक्षा या लॉकडाऊनचे निर्बंध काही प्रमाणात शिथिल आहेत असं म्हटलं आहे. तसेच या लॉकडाऊनमध्ये शाळा आणि जीवनावश्यक वस्तुंचे दुकाने सुरू राहणार आहेत. लोकांना घराबाहेर पडण्याची परवानगी असली तरी सोशल डिस्टेसिंगचे पालन आणि मास्कचा वापर करावाच लागणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. 

कोरोनाचा हाहाकार! फ्रान्समध्ये तिसरी लाट; पॅरिसमध्ये पुन्हा लॉकडाऊन; रुग्णांची संख्या वाढल्याने भरले ICU

फ्रान्समध्ये गेल्या 24 तासांत तब्बलं 35,000 नवे रुग्ण आढळून आले आहेत. आरोग्य मंत्र्यांनी पॅरिसमधील सध्याची परिस्थिती चिंताजनक असल्याचं म्हटलं आहे. जवळपास ICU मध्ये 1200 रुग्णांवर उपचार सुरू असून अनेक ठिकाणी ICU पूर्ण भरले आहेत. नोव्हेंबरच्या तुलेनेत ही संख्या खूपच जास्त आहे. नवीन निर्देशांनुसार, लोकांना घरातून काम करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात येणार आहे. घराबाहेर पडण्यासाठी आणि व्यायामशाळेत जाण्यासाठी आवश्यक परवानगी घ्यावी लागणार आहे. त्याशिवाय कोणत्याही नागरिकाला आपल्या घरापासून 10 किमीपेक्षा अधिक दूर जाता येणार नाही. शाळा, विद्यापीठ सुरूच राहणार असून अत्यावश्यक व्यवसाय सुरूच राहणार आहे. फ्रान्समधील गंभीर परिस्थिती पाहता लसीकरणाला सुरुवात करण्यात आली आहे. 

Web Title: britain gibraltar becomes first nation to fully vaccinate its entire adult population against covid 19

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.