नियमबाह्य बदल्या प्रकरण वेळप्रसंगी विधानसभेतही नेणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2019 12:05 PM2019-01-18T12:05:10+5:302019-01-18T12:05:23+5:30

- पोपटराव भोळे

 In case of non-regular transfers, the assembly will also take the matter in time | नियमबाह्य बदल्या प्रकरण वेळप्रसंगी विधानसभेतही नेणार

नियमबाह्य बदल्या प्रकरण वेळप्रसंगी विधानसभेतही नेणार

Next
ठळक मुद्दे‘त्या’ २५ शिक्षकांच्या बदल्या रद्दच करणार

 

 

जळगाव : जिल्ह्यातील खाजगी प्राथमिक अनुदानित शाळांमधील अतिरिक्त ठरलेल्या २५ शिक्षकांचे समायोजन व बदल्या प्रकरणी दोषींवर कारवाई व्हावी, यासाठी हे प्रकरण वेळप्रसंगी विधानसभेपर्यंत नेले जाईल, अशी माहिती शिक्षण समितीचे सभापती पोपट भोळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
सदर बदल्या पदाधिकाऱ्यांना अंधारात ठेवून केल्या तसेच याबाबत आपल्यालाही अनभिज्ञ ठेवण्यात आल्याचे भोळे यांचे म्हणणे आहे. ही बाब त्यांनी बुधवारी पत्रकारांपुढे मांडली होती. तर तत्कालीन मुख्यकारी अधिकारी दिवेकर यांनी या प्रकरणात नियमबाह्य काहीच नाही, असा खुलासा याचवेळी केल्याने या प्रकरणात पुढे काय होते? याकडे साºयांचे लक्ष लागले असताना सभापती भोळे हे आपल्या मतावर ठाम असून या नियमबाह्य कार्यवाही बाबत आपण आवाज उठवणार असून अधिकाºयांनी दाद दिली नाही तर पक्षाच्या आमदारांमार्फत विधानसभेत हा प्रश्न उपस्थित केला जाईल, असेही भोळे म्हणाले.दरम्यान प्राथमिक शिक्षणाधिकरी बी. जे. पाटील यांनीही सदर प्रकरणात नियमबाह्य असे काहीही नाही, असेच पत्रकारांशी बोलताना गुरुवारी सांगितले. तर जि. प.च्या शाळांमधील ६४ शिक्षकांचे समायोजन अजून बाकी असून तेही लवकरच केले जाईल.

 

Web Title:  In case of non-regular transfers, the assembly will also take the matter in time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.