भुसावळ : ग्राहक कल्याण फाउंडेशनतर्फे राष्ट्रीय ग्राहक दिन विठ्ठल मंदिर वार्डात साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी जिल्हा सचिव ॲड जास्वंदी भंडारी होत्या. प्रमुख वक्ते प्र. ह. दलाल, प्रमुख पाहुणे नाना पाटील, फाऊंडेशनचे राज्य समन्वय राजेश सैनी उपस्थित होते.प्रस्तावना फाउंडेशन तालुकाध्यक्षा उज्वला बागुल यांनी केली. प्रमुख वक्ते प्र.ह दलाल यांनी, ग्राहकांनी वस्तू घेताना कोणती खबरदारी घ्यावी हे सांगितले. ग्राहक म्हणजे जो मूल्य देऊन सेवा घेतो किंवा वस्तू अशी व्यक्ती आणि अशाच व्यक्तीने वस्तू घेताना कोणती काळजी घ्यावी व कुठे व कशा पद्धतीने न्याय मागावा व कोणत्या स्तरावर मागता येईल याविषयी ॲड.जास्वंदी भंडारी (पाटील) यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले. सूत्रसंचालन डॉ.नितीन यावलकर यांनी, तर ॲड.नीलेश भंडारी यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वितेसाठी हर्षल गोरवाडकर, प्रदीप बावस्कर, ॲड.विक्रम शेळके, विवेक सैनी, किशोर बह्राटे , प्रेम परदेशी, मंदार बागुल, अजय रायकवार, कमलाकर महाजन यांनी परिश्रम घेतले. नेहा यावलकर, वंदना चौगुले, रेखा धुपे आदी उपस्थित होते.
भुसावळ येथे ग्राहक दिन साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2020 6:39 PM