भगवान परशुराम जयंती घरीच साजरी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:25 AM2021-05-05T04:25:51+5:302021-05-05T04:25:51+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : दरवर्षी भगवान परशुराम यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात असते. मात्र, यंदा कोरोनाने ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : दरवर्षी भगवान परशुराम यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात असते. मात्र, यंदा कोरोनाने अक्षरश: थैमान घातले असल्यामुळे समाज बांधवांनी १४ मे रोजी घरात राहूनच भगवान परशुराम जयंती साजरी करण्यात यावी, असे आवाहन बहुभाषिक ब्राह्मण संघाच्यावतीने करण्यात आले आहे.
बहुभाषिक ब्राह्मण संघाने भगवान परशुरामांचे सुंदर छायाचित्र तयार करण्यात आले आहे. या चित्राचे नुकतेच विमोचन श्रीराम मंदिर संस्थानचे गादीपती मंगेश महाराज जोशी यांच्याहस्ते करण्यात आले. नंतर छायाचित्र समाज बांधवांना वितरित करण्यात आले आहे. १४ मे रोजी समाज बांधवांनी घरातच राहून जयंती साजरी करावयाची आहे, असे आवाहन करण्यात आले आहे. भगवान परशुराम यांच्या छायाचित्राच्या वितरणासाठी बहुभाषिक ब्राह्मण संघाचे संस्थापक श्रीकांत खटोड, अध्यक्ष अशोक वाघ, सौरभ चौबे, अजित नांदेडकर, सुरेंद्र मिश्रा, किसन अबोटी, शिवप्रसाद शर्मा, डॉ. नीलेश राव, महेश दायमा, संजय कुळकर्णी, पीयूष रावळ, राजेश नाईक, प्रकाश शर्मा, केदार जोशी, विश्वनाथ जोशी, अमला पाठक, श्याम नागला, के. सी. पांडे, पंकज पवनीकर, देवेंद्र भालेराव, निरंजन कुळकर्णी, अजय डोहोळे, दिनकर जेऊरकर आदी परिश्रम घेत आहेत.
९ रोजी रक्तदान शिबिर
भगवान परशुराम जयंतीनिमित्त ९ मे रोजी सकाळी ८ ते दुपारी १२ वाजेपर्यंत आकाशवाणी चौकात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात जास्तीत जास्त समाज बांधवांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन अशोक वाघ यांनी केले आहे.