अमळनेर येथे शिवस्वराज्य दिन साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 12:00 PM2021-06-06T12:00:51+5:302021-06-06T12:01:28+5:30
अमळनेर येथील पंचायत समितीत शिवस्वराज्य दिन साजरा करण्यात आला.
अमळनेर : शासनातर्फे जाहीर केलेला ६ जून शिवस्वराज्य दिन पंचायत समितीत साजरा झाला आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते शिवशक राजदंड स्वराज्य गुढी उभारण्यात आली.
यावर्षापासून शासनाने संपूर्ण महाराष्ट्रात ग्रामपंचायती ,पंचायत समित्या , जिल्हा परिषदमध्ये सकाळी ९ वाजता शिवस्वराज्यदिन साजरा करण्याचे परिपत्रक १जून रोजी जारी केले होते.
अशी आहे ध्वज संहिता
सटीन चा कपडा असलेला भगवा ध्वज ३ फूट रुंद व ६ फूट लांब होता. त्यावर जिरेटोप , सुवर्णहोन, जगदंब तलवार , शिवमुद्रा , वाघनखे या शिवरायांच्या पंच शुभचिन्हानी अलंकृत केला होता. शिवशक राजदंड १५ फुटाचा बांबू किंवा वासा त्यावर सुवर्ण लाल कापडाची गुंडाळी केली होती. ध्वजावर उलटा सुवर्ण कलश , आंब्याची डहाळी , गाठी , पुष्पहार , अष्टगंध , हळद , अक्षता , कुंकू लावून कलशावर अष्टगंधने शिवशक राजदंड स्वराज्यगुढी असे लिहिले होते. पालथा सुवर्ण कलश म्हणजे शिवरायांनी सर्व प्रस्थापित सत्ता पालथ्या करून स्वराज्याचा सार्वभौम मंगल कलश रयतेच्या झोळीमध्ये रिता करून रयतेची झोळी सुख, समृद्धी ,समता व स्वातंत्र्याने भरली त्याचे प्रतीक आहे. आमदार अनिल पाटील यांनी शिवरायांच्या व शिवशक राजदंड स्वराज्य गुढीचे पूजन करून गुढी उभारल्यानन्तर राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीत झाले.
यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती श्याम अहिरे , प्रवीण पाटील , निवृत्ती बागुल , अधीक्षक भुपेंद्र बाविस्कर ,कक्ष अधिकारी किशोर पाटील , विस्तार अनिल राणे , एल डी चिंचोरे , बालविकास प्रकल्प अधिकारी बी बी वारूळकर हजर होते