चाळीसगाव, जि.जळगाव : शेठ नारायण बंकट वाचनालयाच्या स्पर्धा परीक्षा विभागातर्फे शालेय विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या वाचन मार्गदर्शन शिबिराचा समारोप वाचनालयाचे उपाध्यक्ष प्रीतमदास रावलानी यांच्या अध्यक्षतेखाली झाला.पूर्णपात्रे विद्यालयाच्या माजी मुख्याध्यापिका सुनीता महाजन प्रमुख अतिथी होत्या. प्रमुख पाहुण्या सुनीता महाजन, कार्यवाह प्रा.दीपक शुक्ल व प्रकल्प प्रमुख राजेंद्र चिमणपुरे यांनी दीपप्रज्वालन केले. पाहुणे व मार्गदर्शक शिक्षकांचा सत्कार पुस्तक भेट देऊन करण्यात आला. पाहुण्यांचा परिचय संचालक प्रकाश कुलकर्णी यांनी करून दिला.अखिलेश संभाजी पाटील या विद्यार्थ्याने शिबिराबद्दल मनोगत व्यक्त केले. पालक म्हणून मानसी उपासनी यांनी मनोगतात शिबीर घेतल्याबद्दल आयोजकांना धन्यवाद दिले. मार्गदर्शक शिक्षिका सुनीता कासार यांनी मनोगत व्यक्त केले.शिबिरात संचालक बाबासाहेब चंद्रात्रे, विश्वास देशपांड,े राजेंद्र चिमणपुरे, संगीत देव, सुनीता कासार, अरविंद तरटे, रवींद्र देशपांडे इत्यादींनी मराठी साहित्यातील कविता, कथा, कादंबरी, चरित्र इत्यादींबाबत मार्गर्दर्शन केले.शिबिरात एकूण ५० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. अध्यक्षा डॉ.हेमांगी पूर्णपात्रे यांचा संदेश यावेळी वाचून दाखविण्यात आला. प्रा.लक्ष्मीकांत पाठक, मधुकर कासार, मिलिंद देव उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी ग्रंथमित्र अण्णा धुमाळ यांच्या मार्गर्दशनाखाली ज्योती पोतदार , श्याम रोकडे, महेश भंडारी, निखिल नाईक यांनी परिश्रम घेतले.
चाळीसगावला वाचन मार्गदर्शन शिबिराचा समारोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2019 3:59 PM
शेठ नारायण बंकट वाचनालयाच्या स्पर्धा परीक्षा विभागातर्फे शालेय विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या वाचन मार्गदर्शन शिबिराचा समारोप झाला.
ठळक मुद्देपुस्तके देऊन यशस्वी व पाहुण्यांचा सत्कार५० विद्यार्थ्यांनी घेतला शिबिरात सहभागउपक्रमाबद्दल विद्यार्थ्यांनी केली प्रशंसा