चाळीसगावच्या शिक्षकाचा 'स्वच्छता चष्मा' ठरला शिक्षणवारीत लक्षवेधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2018 05:15 PM2018-12-06T17:15:35+5:302018-12-06T17:17:53+5:30
राज्यस्तरीय शिक्षणाची वारी या हा महाराष्ट्र शासनाचा शैक्षणिक उपक्रमात चाळीसगावचे शिक्षक ध्रुवदास राठोड यांनी सादर केलेल्या 'स्वच्छता चष्मा' उपक्रमास चांगला प्रतिसाद मिळाला. शिक्षणवारी नुकतीच मुंबई येथे पार पडली.
चाळीसगाव : राज्यस्तरीय शिक्षणाची वारी या हा महाराष्ट्र शासनाचा शैक्षणिक उपक्रमात चाळीसगावचे शिक्षक ध्रुवदास राठोड यांनी सादर केलेल्या 'स्वच्छता चष्मा' उपक्रमास चांगला प्रतिसाद मिळाला. शिक्षणवारी नुकतीच मुंबई येथे पार पडली.
एमएमआरडीए मैदान बीकेसी मुंबई येथे संपन्न झालेल्या कार्यक्रमात जळगांव जिल्ह्यात अनेक गावात स्वच्छतेची जनजागृती करणाऱ्या राठोड यांचा उपक्रम लक्षवेधक ठरला. उपक्रमात ध्रुवदास ममराज राठोड यांनी ज्या साहित्याद्वारे विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती घडवुन आणली. त्या साहित्याद्वारे शिक्षणाच्या वारीत सादरीकरण केले. राठोड यांनी अस्वच्छतेचे घातचक्र, ज्ञानरचनावादी फुलपाकळ्या, स्वच्छतेचा चष्मा, अशा शैक्षणिक साहित्यांची निर्मिती केली होती. त्या साहित्यापैकी या राज्यस्तरीय वारीत अनेक वेगवेगळ्या स्वच्छतेचे संदेशचे स्लाईडने तयार केलेला स्वच्छता चष्मा वारीचे आकर्षण ठरले. हा चष्मा पाहण्याकरीता शिक्षक व पालकांनी गर्दी केली. यांची निर्मिती व अन्य तांत्रिक बाबींची माहिती वारीस भेट देणारे शिक्षक घेत होते.
चष्म्याद्वारे दुषित पाण्याचे प्रहार, सांडपाण्याची विल्हेवाट, परिसर स्वच्छता, शौचालयाचे महत्व, वैयक्तिक स्वच्छता, डेंग्युविषयी माहिती विद्यार्थ्यांना कशा प्रकारे देता येईल याबरोबरच स्वच्छतेचे महत्व रुजवता येईल, तसेच लोकजागृती कशी घडविता आली. या संबधित माहिती राठोड यांनी पालघर, रायगड, मुंबई शहर, मुंबई उपनगर येथुन आलेल्या मुख्याध्यापक, शिक्षक व पालकांना दिली.
शिक्षण विभागाच्या राज्यस्तरावरील अधिकारी वर्गाने राठोड यांच्या उपक्रमाचे कौतुक केले. समाजकल्याण अधिकारी योगेश पाटील, निवासी शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर सावळे यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वीतेसाठी नितेश पवार, मनोज निकम, संभाजी पाटील यांचे सहकार्य लाभले.