आव्हाने ग्रामपंचायत सत्तेसाठी शिवसेना-राष्ट्रवादीमध्ये रस्सीखेच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:16 AM2021-01-25T04:16:46+5:302021-01-25T04:16:46+5:30
जळगाव : आव्हाने ग्रामपंचायत सत्तेसाठी राष्ट्रवादी-शिवसेनेमध्ये रस्सीखेच निर्माण झाली आहे. आव्हाने ग्रामपंचायतीसाठी असलेल्या १३ जागांसाठी निवडणूक झाली. यामध्ये चार ...
जळगाव : आव्हाने ग्रामपंचायत सत्तेसाठी राष्ट्रवादी-शिवसेनेमध्ये रस्सीखेच निर्माण झाली आहे. आव्हाने ग्रामपंचायतीसाठी असलेल्या १३ जागांसाठी निवडणूक झाली. यामध्ये चार जागा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे किसान सेल तालुकाध्यक्ष ईश्वर पाटील यांच्या पॅनलने जिंकल्या. तर, तीन जागा अपक्ष असून सहा जागा शिवसेनेने जिंकलेल्या आहेत. गेल्या दोन दिवसांपासून गावातील राजकारण बॅनरबाजीमुळे चांगल्यापैकी तापलेले आहे. गेल्या २० वर्षांपासून एकहाती शिवसेनेची सत्ता ग्रामपंचायतीवर होती. परंतु, पहिल्यांदाच या ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादीचे चार उमेदवार निवडून आले आहेत. येणाऱ्या काळामध्ये या सत्तासंघर्षात कोण बाजी मारेल, हे पाहणे खूप उत्सुकतेचे ठरेल. २८ रोजी सरपंचपदाची सोडत निघणार असून त्यानंतरच पुढील राजकीय समीकरणे जोडली जाणार आहेत. मात्र, सरपंच आरक्षण सोडतीपूर्वीच राष्ट्रवादी व शिवसेनेत रस्सीखेच सुरू आहे.