अजय पाटील / आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. ३० - मुख्यमंत्र्यांचा वाढता चहाचा खर्चाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्र्यांना दिल्ली येथे बोलावून, पुढील अर्थसंकल्पात चहाचा स्वतंत्र बजेट काढावा लागेल का ? अशी तंबी दिली. त्यामुळेच जळगाव दौऱ्यात चहाचा खर्च टाळण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विमानातुनच बाहेर निघालेच नाही. मुख्यमंत्र्याचा रद्द झालेल्या जळगाव दौºयाबाबत अशाच काही गमतीशीर तर्क-वितर्क समाज माध्यमांवर नेटकºयांनी मांडत दौरा का रद्द झाला ? याबाबत दिवसभर कारणे शोधण्याचा प्रयत्न केला. दौरा रद्दच्या बहाण्याने अनेकांनी मुख्यमंत्र्यांवर गमतीदार टोमणे मारत चांगलेच धारेवर धरल्याचे दिसून आले.व्हॉट्सअॅप पासून फेसबूकपर्यंत दिवसभर मुख्यमंत्र्यांचा रद्द झालेल्या दौºयाचीच चर्चा होती. दोन वर्षानंतर मुख्यमंत्री शहरात येत असल्याने त्यांच्याकडून अनेक प्रलंबित प्रश्नांबाबत मार्ग निघण्याची शक्यता होती. मात्र, ऐनवेळी दौरा रद्द झाल्याने संतापलेल्या जळगावकरांसह काही राजकीय पक्षांमधील पदाधिकाºयांनी मुख्यमंत्र्यांना व्हॉट्सअॅपवर चांगलेच धारेवर धरले.महापौरांच्या १०० कोटीच्या निधीमुळे बिघडली मुख्यमंत्र्याची तब्येतसोशल मीडिया फिरत असलेल्या एका संदेशात म्हटले होते की, जळगावचे महापौर ललित कोल्हे हे मुख्यमंत्र्यांकडून शंभर कोटी रुपयांचा निधी मागणार असल्याच्या धक्कयाने मुख्यमंत्र्यांची तब्येत बिघडली असल्याचे सांगितले. तर काहींनी शहरात काही युवक संघटनांचे पदाधिकारी मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखविणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांना मिळाली होती. त्यामुळेच मुख्यमंत्र्यांनी दौरा रद्द केल्याची माहिती दिली.खडसे गटाच्या उपद्रवाची मुख्यमंत्र्यांना होती भितीमुख्यमंत्री जिल्ह्यात येणार असल्याने गिरीश महाजन यांचा विरोधी तर एकनाथराव खडसे यांचा समर्थक गटाकडून मुख्यमंत्र्यांना पून्हा खडसेंना मंत्रीपद व क्लीन चीट द्या अशी मागणी करण्यात येणार असल्याची माहिती महाजनांनी मुख्यमंत्र्यांना दिल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी यु टर्न घेतल्याची चर्चा होती. तर माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची प्रकृती खालावल्याने मुख्यमंत्री दिल्ली येथेच थांबले असल्याची चर्चा देखील सोशल मीडियावर रंगली होती. तर काहींनी मंत्रालयात अनेक उंदीरांची हत्या मुख्यमंत्र्यांनी केल्यामुळे जळगावच्या उंदीर संघटनेकडून मुख्यमंत्र्यांविरोधात आंदोलन पुकारण्यात येणार असल्याने मुख्यमंत्र्यांनी जळगावचा दौरा रद्द केला असल्याची चर्चा समाजमाध्यमांमध्ये उमटली.
चहाचा खर्च टाळण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी रद्द केला जळगाव दौरा, नेटीझन्सकडून दिवसभर कारणे शोधण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2018 11:34 PM