यावल तालुकास्तरीय प्रदर्शनात बालसंशोधकांनी मांडली १६२ उपकरणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2019 03:47 PM2019-12-25T15:47:51+5:302019-12-25T15:48:14+5:30
पंचायत समितीच्या शिक्षण विभागातर्फे यावल येथील डॉ.झाकीर हुसेन उर्दू स्कूल व ज्युनियर कॉलेजमध्ये तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते झाले.
यावल/डोंगर कठोरा/चुंचाळे, जि.जळगाव : पंचायत समितीच्या शिक्षण विभागातर्फे यावल येथील डॉ.झाकीर हुसेन उर्दू स्कूल व ज्युनियर कॉलेजमध्ये तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी पंचायत समिती सभापती पल्लवी चौधरी या होत्या.
प्रमुख पाहुणे जि.प.सदस्य रवींद्र पाटील, गटनेते पं.स.सदस्य शेखर पाटील, पुरुजित चौधरी, दिलीप सपकाळे, गटविकास अधिकारी किशोर सपकाळे, गटशिक्षणाधिकारी एजाज शेख, शिक्षण विस्तार अधिकारी नइमोद्दीन शेख, संस्थेचे हाजी मो.ताहेर शेख चाँद, हाजी इक्बालखान, हाजी शेख इब्राहिम, हाजी मुस्तुफा, हाजी अत्ताउल्ला, झेड.ए.खान, केंद्रप्रमुख एन.डी.तडवी, सुरेश तायडे, प्रमोद सोनार, दस्तगिर खान, सुलोचना धांडे, रझोदकर, तालुका समनव्यक डॉ.नरेंद्र महाले, मुख्याध्यापक रहीम शेख, तुकाराम बोरोले, जयंत चौधरी, पी.एस.सोनवणे, अशपाक शेख, बशारत अली उपस्थित होते. मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.
या प्रदर्शनात बालवैज्ञानिकांनी विविध लक्षवेधी उपकरणे, प्रतिकृतींची मांडणी केली. त्यामध्ये प्राथमिक ४७, माध्यमिक ३७, तर शिक्षकांचे शैक्षणि साहित्य ७८ अशी एकूण १६२ उपकरणे होती.
प्रदर्शनात कृषी व जैविक शेती, आरोग्य व स्वच्छता, संसाधन व व्यवस्थापन, वाहतूक व दळणवळण, गणितीय प्रतिकृती आदींची विषयाशी निगडीत उपकरणे होती.
बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
निकाल -
प्राथमिक स्तर- प्रथम राजस वाणी (सरस्वती विद्यालय, यावल), द्वितीय प्रदीप पाटील (जेटी महाजन विद्यालय), तृतीय समी देशमुख (डॉ.जाकिर हुसेन विद्यालय, यावल)
माध्यमिक स्तर- प्रथम भूषण लोधी (शारदा माध्यमिक विद्यालय, साकळी), द्वितीय पवन सोनवणे (साने गुरुजी विद्यालय, यावल), तृतीय शाहिद पिंजारी (डॉ.जाकीर हुसेन विद्यालय, यावल)
शिक्षकांचे शैक्षणिक साहित्य- प्राथमिक प्रथम कल्पना माळी (जि.प. शाळा परसाडे), माध्यमिक प्रथम मोहम्मद अझहर शेख मोमीन (डॉ.जाकीर हुसेन विद्यालय, यावल)
आदिवासी शाळा-
प्राथमिक प्रथम तुषार अहिरे (म.ज्योतिराव फुले विद्यालय, मोहराळा) माध्यमिक जगदीश मोरे (ना.धों.महानोर विद्यालय, डांभुर्णी)
प्रयोगशाळा परिचर- माध्यमिक खान असदुल्ला.
सूत्रसंचालन डॉ.नरेंद्र महाले तर आभार नइमोद्दीन शेख यांनी मानले. परीक्षक प्रा.राजेंद्र पवार, शांताराम गायकवाड, अर्शदखान पठाण, मेहमूदखान रशिदखान, मुज्जफर अली, जलील अहमद, हेमंत पाटील हे होते.
यावेळी विज्ञान शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. यशस्वीतेसाठी विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.