जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाढदिवस साजरा न करता, आरोही चेतन निकम या चिमुकलीने वाढदिवसाच्या कार्यक्रमाच्या खर्चाच्या रक्कमेतून हजार मास्क वाटपाचा संकल्प केला आहे. त्यानुसार शुक्रवारी तिने जिल्ह्याचे पालकमंत्री यांना एक हजार मास्क सुपूर्द केले. याप्रसंगी तिचे वडील चेतन व ऋचा निकम आदींची उपस्थिती होती.
पालकमंत्र्यांकडे चिमुकलीने सुपूर्द केले एक हजार मास्क
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2020 8:15 PM