चोपडा तालुक्यात ७० टक्के शेतकऱ्यांची कापूस लागवड पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:13 AM2021-05-30T04:13:56+5:302021-05-30T04:13:56+5:30

तालुक्यातील शहरासह ग्रामीण परिसरात शेतकरी पूर्वहंगामी कापूस लागवडीच्या प्रतीक्षेत आहेत. परंतु, शासनाच्या धोरणानुसार २५ मेपासून बियाणे वितरणाच्या निर्णय असला ...

In Chopda taluka 70% of farmers have completed cotton cultivation | चोपडा तालुक्यात ७० टक्के शेतकऱ्यांची कापूस लागवड पूर्ण

चोपडा तालुक्यात ७० टक्के शेतकऱ्यांची कापूस लागवड पूर्ण

Next

तालुक्यातील शहरासह ग्रामीण परिसरात शेतकरी पूर्वहंगामी कापूस लागवडीच्या प्रतीक्षेत आहेत. परंतु, शासनाच्या धोरणानुसार २५ मेपासून बियाणे वितरणाच्या निर्णय असला तरी जवळपास सर्व बागायतदार शेतकऱ्यांची कापूस लागवड झाली आहे. कोरडवाहू शेतकऱ्यांची मात्र कापूस लागवड लांबणीवर पडत असल्याने शेतकरीवर्गात नाराजीचा सूर उमटत आहे. याबाबत प्रत्यक्ष पाहणी केली असता शहरासह ग्रामीण परिसरात शेतकरी दरवर्षी १५ मेपासून कापूस लागवड करीत असतो, तर मेच्या शेवटच्या आठवड्यापासून सर्वच बागायतदार शेतकरी कापूस लागवडीस प्राधान्य देतात. परंतु, गेल्या दोन वर्षांपासून गुलाबी बोंड अळीचा धुमाकूळ लक्षात घेता व त्यावर नियंत्रण ठेवता यावे, याकरिता शासनाचे १ जूननंतर कापूस लागवडीचे आवाहन पायदळी तुडवत शेतकऱ्यांनी १५ मे पासूनच कापूस लागवड केली आहे. पूर्वहंगामी कापूस लागवडीवर शेतकरी भर देत असतो; परंतु सामूहिक गुलाबी बोंड अळीच्या नियंत्रणासाठी शासनाने सर्वच शेतकऱ्यांना १ जूननंतर कापूस लागवड बंधनकारक केली आहे. कृषी विभाग सुस्त असल्याने मात्र जवळपास कापूस लागवड पूर्ण झाली आहे. तसेच यावर्षी महाराष्ट्र राज्यामध्ये बंदी असलेले गुजरातमधील फाइव्ह बीजी बियाण्यांची लागवड केली आहे. अनेक शेतकऱ्यांनी १५ मे नंतर लागवड केल्याने एक फवारणी आणि एक खताचा डोसही दिला गेला आहे.

===Photopath===

290521\29jal_11_29052021_12.jpg

===Caption===

चोपडा तालुक्यात ७० टक्के शेतकऱ्यांची कापूस लागवड पूर्ण

Web Title: In Chopda taluka 70% of farmers have completed cotton cultivation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.