गणेश विसर्जनस्थळी येण्यास नागरिकांना बंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2020 12:52 PM2020-08-22T12:52:13+5:302020-08-22T12:52:27+5:30
गणेश विसर्जनस्थळी येण्यास नागरिकांना बंदी
जळगाव : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी यंदा गणेशोत्सवात बाप्पाचे आगमन व विसर्जनाची मिरवणूक निघणार नाही. शासनाने त्याला बंदी घातली आहे त्याशिवाय शारीरिक अंतर ठेवून शासनाच्या नियमानुसार हा उत्सव पार पाडावा असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर पंजाबराव उगले यांनी केले आहे. विसर्जनासाठी मूर्ती कलेक्शन सेटर सुरु करण्यात येणार आहे.
आजपासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ‘लोकमत’ जवळ आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले की, यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घरगुती व खासगी मूर्र्तींना थेट तलाव इतर ठिकाणी विसर्जनास शासनाने बंदी घातली आहे. जिल्ह्यात स्थानिक प्रशासनाच्यावतीने वार्डनिहाय तसेच मंडळाच्या ठिकाणी मूर्ती कलेक्शन सेंटर उभारण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी आपल्याकडीेल मूर्ती कलेक्शन सेंटर वरच आणाव्यात. तेथून आप्पासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान मंडळ व प्रशासनाच्या वतीने सजवलेल्या रथात अथवा वाहनात या मूर्ती विसर्जनासाठी नेण्यात येणार आहेत, खाजगी व्यक्तीने तलावाच्या ठिकाणी येण्याची आवश्यकता नाही. तेथे त्यांना निर्बंध घालण्यात आले आहेत. हा निर्णय जळगाव शहरापुरता नाही तर संपूर्ण जिल्ह्यात लागू असल्याचे पोलीस अधीक्षक डॉ. उगले यांनी स्पष्ट केले आहे. मंडळाच्या ठिकाणी आवाजाची मर्यादा ठेवून लाऊड स्पीकरला परवानगी दिली आहे.
-कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठीच गर्दी टाळण्यासाठी प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.
-कोरोना असला तरी नागरिकांनी हा उत्सव आनंदाने साजरा करावा,मात्र कुठेही कायदा सुव्यवस्थेला बाधा पोहोचेल असे काम करू नये.
-सोशल मीडिया अथवा इतर ठिकाणी अफवा पसरविणाºया लोकांवर कडक कारवाई केली जाणार आहे, त्यासाठी सायबर पोलीस ठाण्यात स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे.
-दरम्यान,याच काळात अडीच हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई देखील केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
असे आहेत जिल्ह्यातील मंडळ
एकुण मंडळ २३२१
सार्वजनिक १७०१
खासगी ४७९
एक गाव एक गणपती १४१