शहराचा पॉझिटिव्हिटि रेट ४० टक्क्यांवरून दीड टक्क्यांवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 04:12 AM2021-06-27T04:12:21+5:302021-06-27T04:12:21+5:30
आनंद सुरवाडे लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : मध्यंतरीजिल्हाभरात सर्वात मोठे हॉटस्पॉट म्हणून जळगाव शहर समोर आले होते. कोरोना ...
आनंद सुरवाडे
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : मध्यंतरीजिल्हाभरात सर्वात मोठे हॉटस्पॉट म्हणून जळगाव शहर समोर आले होते. कोरोना संसर्गाने मार्चच्या तिसऱ्या आठवड्यात ४० टक्यांपर्यंत मजल मारली होती. ही दुसऱ्या लाटेतील उच्चांकी नोंद असून जूनच्या तिसऱ्या आठवड्यात पॉझिटिव्हिटी रेट हा घसरून दीड टक्क्यांवर आला आहे. दिलासा असला तरी काही प्रमाणात का होईना संसर्ग अजून कायम असून नागरिकांनी दक्षता घेणे महत्त्वाचे असल्याचे तज्ञ सांगतात.
पॉइंटर
- शहरात सद्यस्थितीत ३०० चाचण्या सरासरी केल्या जात आहेत.
- दिवसाला आढळून येणारे बाधितांचे प्रमाण हे दहा पेक्षा कमी आहे.
- लो-ट्रान्समिशन असले तरी संसर्ग संपलेला नाही, दक्षता न घेतल्यास तो बळावू शकतो, असे डॉक्टर सांगताय.
- मे महिन्यापासून पॉझिटिव्हिटीचा आलेख घसरला आहे.
कोट
हा आलेख स्थिर ठेवणे हे आपल्या हाती आहे. सद्या कोरोना रुग्ण कमी असले तरी आजार संपलेला नाही. काही प्रमाणात का असेना मात्र, शहरात संसर्ग आहेच. आता सद्यस्थिती ८ ते ९ रुग्ण बाधित आढळून येत आहेत. हे प्रमाण कमी आहे, मात्र, शून्य झालेले नाही. तेव्हा काळजी घेणे महत्त्वाचे आहे.
- डॉ. संजय पाटील, वैद्यकीय अधिकारी मनपा