स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक व स्थापत्य आरेखक समकक्ष : औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2018 07:09 PM2018-11-12T19:09:46+5:302018-11-12T19:15:05+5:30
स्थापत्य अभियांत्रिकी आणि स्थापत्य आरेखक ही पदे समकक्ष असल्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिला आहे. यामुळे याचिकाकर्त्यास तीन महिन्यांच्या आत नियुक्ती देण्याचा आदेशही खंडपीठाने दिला आहे.
यावल, जि.जळगाव : स्थापत्य अभियांत्रिकी आणि स्थापत्य आरेखक ही पदे समकक्ष असल्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिला आहे. यामुळे याचिकाकर्त्यास तीन महिन्यांच्या आत नियुक्ती देण्याचा आदेशही खंडपीठाने दिला आहे.
सन २०११ मध्ये जलसंपदा विभागाने काढलेल्या जाहिरातीनुसार स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पदासाठी घेतलेल्या लेखी व तोंडी परीक्षेत तालुक्यातील किनगाव येथील मायादेवी खैरनार ह्या दोन्ही परीक्षेत उत्तीर्ण झाल्या होत्या. त्याचे नाव निवड यादीमध्ये समाविष्ट असताना जलसंपदा विभागाने ऐनवेळेवर स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पदाशी स्थापत्य आरेखक पद समकक्ष नसल्याचे सांगून नेमणूक देता येत नाही म्हणून नेमणूक आदेश दिला नाही. ही पदवी समकक्ष असताना नियुक्ती दिली नाही म्हणून त्यांनी संबंधित विभागाविरूद्ध मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात घेतली होती. खंडपीठाने नुकत्याच दिलेल्या निर्णयात जलसंपदा विभागास स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक व स्थापत्य आरेखद हे पद समकक्ष असल्याचा निर्णय देत तीन महिन्यांच्या आत खैरनार यांना सेवेत रुजू करण्याचे आदेश दिले आहेत.