जुन्या जागांवर रहिवाशांच्या जागा उताऱ्यांचा मार्ग मोकळा?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:13 AM2021-06-24T04:13:16+5:302021-06-24T04:13:16+5:30
हा उतारा मिळण्यासाठी नगरपालिका प्रशासन, महसूल प्रशासन आणि भूमी अभिलेख कार्यालय यांनी मिळून तोडगा काढावा. तसेच नागरिकांना कुठलाही आर्थिक ...
हा उतारा मिळण्यासाठी नगरपालिका प्रशासन, महसूल प्रशासन आणि भूमी अभिलेख कार्यालय यांनी मिळून तोडगा काढावा. तसेच नागरिकांना कुठलाही आर्थिक भुर्दंड न होता त्यांना उतारा कसा देता येईल, याबाबत कार्यवाही करा व आढावा सादर करा, अशी सूचना खासदार उन्मेश पाटील यांनी केली होती. त्यानुसार तहसील कार्यालयात ही बैठक पार पडली.
यावेळी खासदार उन्मेश पाटील, प्रांताधिकारी लक्ष्मीकांत साताळकर, तहसीलदार अमोल मोरे, नगराध्यक्षा आशालता चव्हाण, पालिकेचे मुख्याधिकारी नितीन कापडणीस व्यासपीठावर उपस्थित होते. बैठकीत अरुण चौधरी, महारू चौधरी, संतोष चौधरी या नागरिकांनी आपल्या अडचणी मांडल्या.
बैठकीला भाजप शहराध्यक्ष व नगरसेवक घृष्णेश्वर पाटील, पालिकेतील गटनेते संजय रतनसिंग पाटील, नगरसेवक मानसिंग राजपूत, नगरसेवक बापू अहिरे, नगर अभियंता विजय पाटील, अव्वल कारकून शैलेश राजपूत, प्रभाकर चौधरी, सदानंद चौधरी, हर्षल चौधरी, बंडू पगार, अनिल गोत्रे, अरुण चौधरी, शुभम पाटील, संजय कापसे, भूमिअभिलेख उपअधीक्षक दीपक साळवे, अरुण शिंपी उपस्थित होते.
यावेळी पालिकेचे नगर अभियंता विजय पाटील, भूमी अभिलेख उपअधीक्षक दीपक साळवे, अव्वल कारकून शैलेंद्र राजपूत यांनी अडचणींबाबत माहिती दिली. उपस्थित नगरसेवकांनी शहरातील विविध भागांतील अडचणी मांडल्या. येत्या रविवारी यावर तोडगा काढण्यासाठी बैठक बोलवावी, असे खासदार पाटील यांनी यावेळी सांगितले.
चौकट
घरकुलांबाबत सर्व्हे, ‘त्या’ एजन्सीचे पेमेंट थांबवा
खासदार उन्मेश पाटील यांनी शासन निर्णयाच्या अधीन राहून या नागरिकांना या समस्येतून बाहेर काढण्यासाठी तातडीने उपाययोजना करा व याबाबत बैठक घेऊन आढावा बैठकीत याबाबतचा तपशील सादर करा. समस्याग्रस्त सर्व नागरिकांना कोणत्याही प्रकारचा आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार नाही याची काळजी घ्यावी. तसेच घरकुलांबाबत जो सर्व्हे केला आहे, त्याबाबत पालिकेने प्रभावी भूमिका घ्यावी व संबंधित एजन्सीचे पेमेंट थांबवा, अशा सूचना खासदार उन्मेश पाटील यांनी येथे दिल्या.
===Photopath===
230621\23jal_5_23062021_12.jpg
===Caption===
चाळीसगाव तहसील कार्यालयात समस्याग्रस्त नागरिकांच्या बैठकीत खासदार उन्मेश पाटील, नगराध्यक्षा आशालता चव्हाण, लक्ष्मण साताळकर, अमोल मोरे, नितीन कापडणीस.