सिंधी कॉलनीत ६०० मूर्तींचे संकलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:18 AM2021-09-21T04:18:35+5:302021-09-21T04:18:35+5:30

टायगर ग्रुप जळगावतर्फे शहरातील सिंधी कॉलनी भागात श्रीगणेश मूर्ती व निर्माल्य संकलन केंद्र रविवारी उभारण्यात आले होते. केंद्रावर ...

Collection of 600 idols in Sindhi Colony | सिंधी कॉलनीत ६०० मूर्तींचे संकलन

सिंधी कॉलनीत ६०० मूर्तींचे संकलन

Next

टायगर ग्रुप जळगावतर्फे शहरातील सिंधी कॉलनी भागात श्रीगणेश मूर्ती व निर्माल्य संकलन केंद्र रविवारी उभारण्यात आले होते. केंद्रावर जवळपास ६०० गणेश मूूर्तींचे संकलन करण्यात आले. या उपक्रमासाठी संस्थापक अध्यक्ष जालिंदर जाधव, तानाजी जाधव, सागर कांबळे, हृषिकेश भांडारकर, गौरव उमप, सागर सपके, मनोज बाविस्कर, सोपान मानकर, नंदलाल मराठे, किरण चौधरी, राहुल उमप, अंकुश मराठे, विवेक नितले, लाला उमप व चिंचोली ग्रामपंचायतचे सदस्य आनंद घुगे, दीपक गायकवाड, दीपक मराठे, नीलेश बागडे, साई उमप, सोनू तडवी, शुभम उमप, किशोर कसबे, सागर गायकवाड, बाळा निंबाळकर, मनोज पाटील आदींनी परिश्रम घेतले.

नि:स्वार्थ जनसेवा प्रतिष्ठानतर्फे निर्माल्य संकलन

नि:स्वार्थ जनसेवा प्रतिष्ठानच्यावतीने श्रीगणेश मूर्ती व निर्माल्य संकलन उपक्रम राबविण्यात आला. यात अविनाश जावळे व दीपाली कासार यांनी स्वत: मेहरूण तलाव परिसर भागात गणपती विसर्जनासाठी येणाऱ्या नागरिकांकडून निर्माल्य संकलन करून ते मनपाच्या संकलन केंद्रात सुपूर्द करून त्याची योग्य ठिकाणी विल्हेवाट करण्यात आली.

Web Title: Collection of 600 idols in Sindhi Colony

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.