संपादित जमिनीचा मोबदला लवकरच, मुख्यमंत्र्यांचे आश्वासन
By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2018 06:55 AM2018-07-14T06:55:41+5:302018-07-14T06:55:52+5:30
नरडाणा येथील एमआयडीसीच्या तिसऱ्या टप्यासाठी संपादीत केलेल्या जमिनीचा मोबदला महिन्याभरात देवू असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतक-यांना दिले.
नरडाणा : नरडाणा येथील एमआयडीसीच्या तिसऱ्या टप्यासाठी संपादीत केलेल्या जमिनीचा मोबदला महिन्याभरात देवू असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतक-यांना दिले.
नरडाणा एमआयडीसीच्या तिसºया टप्यासाठी क्रमांक तीनच्या विकासासाठी दहा वर्षांपूर्वी जमीन संपादनाची प्रक्रिया सुरू झाली होती.
नरडाणा येथील एमआयडीसी अंतर्गत येणारी ६६७ हेक्टर जमिनधारक शेतक-याना सदर जमिनीवर कोणत्याही प्रकारचे खरेदी विक्री व्यवहार करता येत नाही. तसेच जमिनीवर कोणत्याही बॅका कर्ज देत नाही. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. या प्रश्नासंदर्भात शिंदखेडा तालुक्यातील नरडाणा, गोराणे, माळीच, मेलाणे, जातोडा येथील शेतकºयांनी आमदार अनिल गोटे यांची भेट घेऊन त्यांना समस्या सांगितली. आपला एमआयडीसीचा प्रश्न मी मार्गी लावतो असे आश्वासन त्यांनी दिले. त्याप्रमाणे नागपूर येथे मुख्यमंत्री दालनात शिंदखेडा तालूक्यातील गोराणे, नरडाणा, माळीच,मेलाने, जातोडा येथील शेतकºयांची आमदार अनिल गोटे याच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक झाली. त्यात मुख्यमंत्री यांनी एक महिन्याच्या आत हा प्रश्न निकाली काढतो. आपण कोणीही टोकाची भूमिका घेऊ नका. आपल्या जमिनींना माबदला देऊ असे आश्वासन दिले.
यावेळी राजेंद्र पाटील, अनिल भामरे, संजय पाटील, संजय कदम, संतोष आखाडे, देविदास देसले, रविंद्र देसले शेतकरी उपस्थित होते.
दहा वर्षांपासून संघर्ष
शेतकºयांच्या संपादित केलेल्या जमिनीला योग्य मोबदला मिळावा म्हणून गेल्या दहा वर्षांपासून त्यांचा संघर्ष सुरू होता. त्याला आता यश मिळाले आहे.