अमळनेर तालुक्यातकाँग्रेस, शिवसेना तालुकाध्यक्ष यांचे पॅनल पराभूत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 01:28 PM2021-01-18T13:28:21+5:302021-01-18T13:29:01+5:30
अमळनेर : तालुक्यात ग्रामपंचायत निवडणूक पक्षविरहीत निवडणुका झाल्या असल्या तरी काही ठिकाणी काँग्रेसच्या व राष्ट्रवादी नेत्यांचे पॅनल पराभूत ...
अमळनेर : तालुक्यात ग्रामपंचायत निवडणूक पक्षविरहीत निवडणुका झाल्या असल्या तरी काही ठिकाणी काँग्रेसच्या व राष्ट्रवादी नेत्यांचे पॅनल पराभूत झाले आहे.
निंभोरा येथील किसान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश पिरन पाटील यांचे पॅनल पराभूत होऊन सानेगुरुजी स्मारक चे कार्यकर्ते प्रा सुनील पाटील व समाधान धनगर यांचे पॅनल विजयी झाले त्यांच्या 6 जागा आल्या आहेत काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गोकुळ बोरसे यांच्या गडखाम्ब गावात बापूराव खुशाल पाटील यांचे पॅनल विजयी झाले असून त्यांना 9 जागा मिळाल्या आहेत खवशी येथील काँग्रेस किसान सेल चे तालुकाध्यक्ष बी के सूर्यवंशी यांचे पॅनल पराभूत होऊन त्यांच्या विरोधातील श्यामकांत देशमुख यांचे पॅनल विजयी झाले त्यांना 6 जागा मिलाळ्या आहेत तर डांगरी येथील राष्ट्रवादीचे नेते तसेच माजी सरपंच अनिल शिसोदे यांचे पॅनल पराभूत होऊन दिनेश शिसोदे यांचे पॅनल विजयी झाले आहे तर शिरूड येथे राष्ट्रवादीच्या नेत्या जिल्हा बँक संचालिका तिलोत्तमा पाटील व शेतकी संघाचे माजी अध्यक्ष महेंद्र पाटील यांचे पॅनल पराभूत होऊन भाजप चे पस सभापती श्याम अहिरे यांचे पॅनल विजयी झाले आहे गडखाम्ब येथे काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गोकुळ बोरसे यांचे पॅनल पराभूत होऊन माजी सरपंच बापूराव खुशाल पाटील यांचे पॅनल विजयी झाले आहे. कळमसरे येथे राष्ट्रवादीचे पिंटू राजपूत यांचे पॅनल विजयी झाले तर माजी सरपंच मुरलीधर महाजन यांचे पॅनल पराभूत झाले आहे सात्री येथे भाजप चे महेंद्र बोरसे यांचे पॅनल विजयी झाले आहे झाडी येथे काँग्रेसचे धनगर दला पाटील यांच्या पॅनललाही पराभवाला सामोरे जावे लागले आहे. तेथे डॉ भुपेंद्र पाटील यांचे पॅनल विजयी झाले आहे तर लोण चारम येथे भाजप चे महेश पाटील यांचे पॅनल पराभूत होऊन विरोधकांनी सर्व 5 जागांवर विजय मिळवला आहे. पाडळसरे येथे मात्र राष्ट्रवादीचे भागवत पाटील यांचे पॅनल विजयी झाले आहे अंचलवाडी येथे राष्ट्रवादीचे विकास पाटील यांच्या पॅनल ने पूर्ण 7 जागांवर विजय मिळवला आहे. चौबारी येथे शिवसेना तालुका प्रमुख विजय पाटील यांचेही पॅनल पराभूत झाले आहे त्र्यंबक पाटील यांचे पॅनल विजयी झाले आहे