जळगाव - जामोद येथील ग्रामीण रुग्णालयामधील वैद्यकीय अधिकाऱ्यांसह परिचारिका तथा इतर रिक्त पदे भरण्यासाठी काँग्रेसच्या वतीने गुरुवारी सकाळपासून रुग्णालयाच्या इमारतीवर चढून शोले स्टाईल आंदोलन करण्यात येत आहे. जोपर्यंत याठिकाणी ठोस आश्वासन मिळत नाही तोपर्यंत उतरणार नाही अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली आहे.
अजहर देशमुख यांच्यासह नगरसेवक नितीन ढगे, सय्यद अफरोज, आशिष वायझोडे, सय्यद नासिक शेख शरीक इत्यादी कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले आहेत. गेल्या कित्येक महिन्यांपासून या ग्रामीण रुग्णालयामध्ये डॉक्टरची कमतरता असून रुग्णांची हेळसांड होत आहे. जिल्हा शल्य चिकित्सक कोणतीही दखल घेण्यास तयार नाहीत. याबाबत वारंवार निवेदन देऊनही वरिष्ठ पातळीवर दखल घेतली गेली नाही म्हणूनच अजहर देशमुख यांनी शोले स्टाईल आंदोलन सुरू केले आहे.