भूता परस्परे जडो.. मैत्र जीवांचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2020 12:35 AM2020-02-17T00:35:21+5:302020-02-17T00:35:48+5:30
संत ज्ञानेश्वर महाराज यांनी श्रीमद् भगवदगीतेवर ज्ञानेश्वरी रूपी अलंकार चढवला आहे. ज्ञानेश्वरी ग्रंथ महाराष्टÑात जेवढे भक्ती मार्गाचे सांप्रदाय आहे ...
संत ज्ञानेश्वर महाराज यांनी श्रीमद् भगवदगीतेवर ज्ञानेश्वरी रूपी अलंकार चढवला आहे. ज्ञानेश्वरी ग्रंथ महाराष्टÑात जेवढे भक्ती मार्गाचे सांप्रदाय आहे त्या सर्वांना पुज्यनिय आहे. सर्वात मोठा जो सांप्रदाय तो वारकरी पंथ (वारकरी संप्रदाय) या ग्रंथास व ग्रंथकर्त्यास ज्ञानेश्वर महाराज यांना माऊली म्हणून संबोधतात. या माऊलीच्या गजराने लाखो भाविक आळंदी ते पंढरपूर आषाढीवारीस पायी पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनाला जातात. माऊलींनी ज्ञानेश्वरी गं्रथामध्ये शेवटी पसायदान मागितले आहे.
भगवान गोपाळ कृष्णाने त्यांचा शिष्य अर्जुनास कुरूक्षेत्रावर केलेला उपदेश. जो त्यांच्या मुखातून बाहेर पडलेले शब्द श्रीमद् भगवद गीता होय. गीता ही संस्कृतमध्ये आहे. तो उपदेश, तत्वज्ञान, ज्ञानसागर सर्व सामान्यांपर्यंत सोप्या प्राकृत मराठी भाषेत वेदशास्त्र, पुराण यांनाही वेड लावणारे साहित्यिक रूप आहे. मराठी मायबोलीच्या प्रांतामध्ये ब्रह्मविद्या सकल ग्रंथ ज्ञानेश्वर महाराजांनी दिलेला एक ईश्वरी प्रसाद आहे. यातूनच वारकरी सांप्रदाय वृद्धींगत होत आहे.
संत ज्ञानेश्वर महाराजानंतर अनेक संत महात्म्यांनी पूर्वी ज्ञानेश्वरी ग्रंथ हस्त लिखित तयार करून प्रचार, प्रसार केला. पुढे बंकट स्वामी, कुंटे महाराज, साखरे महाराज, ढवळे महाराज, गोडबोले महाराज आणि ज्ञानेश्वरीचे गाढे आभ्यासक प्राचार्य मामासाहेब दांडेकर यांनी ज्ञानेश्वरी ग्रंथाचा प्रचार प्रसार केला. तसेच खान्देशात सद्गुरू झेंडूजी महाराज दिंडी परंपरेतील वै.राजाराम शास्त्री महाराज यांनी ज्ञानेश्वरी पारायण व गिता पारायण सप्ताहातून खान्देशात मोठ्या प्रमाणात स्त्री-पुरूषांकडून गितेचे ज्ञानेश्वरी पारायण करून घेतले.
- गोपाळ महाराज ढाके, भादली ता. जळगाव.