वाद झाल्याने शारीरिक संबंधांचे फोटो अन् व्हिडिओ केले व्हायरल; जळगावातील धक्कादायक घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2021 07:57 PM2021-12-22T19:57:48+5:302021-12-22T19:59:15+5:30
वकिलाविरुद्ध गुन्हा दाखल
जळगाव: शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यास नकार दिल्याने याआधी महिलेसोबत प्रस्थापित केलेल्या शारीरिक संबंधाचे व्हिडीओ व फोटो पीडितेचा मुलगा व भावालाच पाठवून बदनामी करणाऱ्या राजेश साहेबराव गवई (रा. श्यामनगर, जळगाव) या वकिलाविरुद्ध मंगळवारी रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वी सरकारी अभियोक्ता असताना गवई याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच घेताना रंगेहाथ पकडले होते. फोटो व्हायरल केले म्हणून पीडित महिलेनेच पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली आहे.
राजेश गवई याचे पीडित महिलेशी सूत जुळले होते. त्यांच्यात संमतीने शरीरसंबंध प्रस्थापित झाले होते. मात्र कालांतराने त्यांच्यात वाद निर्माण झाले. या वादानंतर गवई याने तिच्यासोबतच्या शरीरसंबंधाचे नकळत व्हिडीओ व फोटो काढले. त्यानंतर महिलेच्या भावासह मुलाला १७ डिसेंबर रोजी मोबाईलवरून हे व्हिडीओ व फोटो पाठवत बदनामी केली.
‘तू कुठेही गेली तरी माझे काहीच होणार नाही’ असे हा वकील सांगत होता. म्हणून या पीडित महिलेने पोलिसात फिर्यादी दिली. त्यावरून गवईविरुद्ध कलम ३५४ (ड), ५०४, ५०६, माहिती तंत्रज्ञान कायदा २००८ चे कलम ६६ (अ), ६६ (इ), ६७ (अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस निरीक्षक विजय शिंदे करीत आहेत.
एकानं इस्लामपूरात अन् दुसऱ्यानं कोल्हापूर रस्त्यावरील लॉजवर नेऊन मुलीवर केला बलात्कार https://t.co/ZlsB8iEWPi
— Lokmat (@lokmat) December 22, 2021