धरणगावला भाजप पदाधिकाऱ्यांच्या घरासमोर फटाके फोडल्यावरून वाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2019 11:24 PM2019-12-30T23:24:12+5:302019-12-30T23:26:53+5:30

नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या निकालानंतर विजयी शिवसेना उमेदवाराच्या विजयी मिरवणुकीत भाजप पदाधिकाºयाच्या घरासमोर फटाके फोडल्यावरुन वादावादी झाली.

The controversy came after fireworks broke out in front of BJP office-bearers in Dhangaon | धरणगावला भाजप पदाधिकाऱ्यांच्या घरासमोर फटाके फोडल्यावरून वाद

धरणगावला भाजप पदाधिकाऱ्यांच्या घरासमोर फटाके फोडल्यावरून वाद

Next
ठळक मुद्देतिघा शिवसैनिकांविरुद्ध गुन्हा दाखलजाब विचारल्यावरून उद्भवला संघर्ष

धरणगाव, जि.जळगाव : नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या निकालानंतर विजयी शिवसेना उमेदवाराच्या विजयी मिरवणुकीत भाजप पदाधिकाºयाच्या घरासमोर फटाके फोडल्यावरुन वादावादी झाली. याप्रकरणी भाजप पदाधिकाºयाने दाखल केलेल्या गुन्ह्यानुसार शिवसेनेच्या तिघांवर गुन्हा दाखल झाला.
याबाबत वृत्त असे की, लोकनियुक्त नगराध्यक्ष निवडणुकीत शिवसेना उमेदवार नीलेश सुरेश चौधरी यांनी भाजप उमेदवार मधुकर रोकडे यांचा पराभव केला. या विजयानंतर शिवसेना कार्यकर्त्यांनी विजयी मिरवणूक काढली. ती भाजपचे पदाधिकारी शिरीष बयस यांच्या घराजवळून जात असताना समाधान शांताराम पाटील (होमगार्ड), सचिन रघूनाथ पाटील, मच्छिंद्र पाटील (बुट्या) यांनी शिरीष बयस यांच्या घरासमोर फटाक्यांची लड लावली. याचा जाब विचारला असता तिघांनी शिरीष बयस यांच्याशी हुज्जत घालून हाणामारी करण्याचा प्रयत्न केला. त्यात बयस यांची सोन्याची चेैन तुटली. या फबाबत बयस यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत सपोनि पवन देसले व अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पुढील तपास करत आहेत.

Web Title: The controversy came after fireworks broke out in front of BJP office-bearers in Dhangaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.