पोलिसांकडून देण्यात आलेल्या निर्वाणीच्या इशाऱ्यामुळे अॅडमिन सावध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2020 03:57 PM2020-04-12T15:57:30+5:302020-04-12T16:24:29+5:30
बहुतांश ग्रुप अॅडमिन यांनी केवळ आपली पोस्ट शेअर करत येईल, अशी सेंटीग केली आहे.
डिगंबर महाले
अमळनेर, जि.जळगाव : लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर सर्वच जण रिकामे बसले आहेत. हल्लीच्या काळात ‘रिकामे मन सोशल मीडियाचे धन’ म्हटल्यास वावगे ठरू नये. परिणामी कोरोना आणि एकूणच स्थिती यावर अनेकांनी वस्तुस्थितीजन्य (रियल) क्लिप्स, टिक टॉक, जोक्स, मार्गदर्शक मेसेजेसचा अक्षरश: पाऊस पाडला आहे. अजूनही या पावसात बºयापैकी सर्वांना भिजविणे काहींनी सुरूच ठेवले आहे. मात्र दोन दिवसांपूर्वी राज्य सायबर सेलचे पोलीस उपमहानिरीक्षक हरीश बैजल यांची सोशल मीडिया विशेषकरून व्हॉट्सअॅपवरून प्रसारित होणाºया कोरोनाबद्दलच्या संदेशांवर नियंत्रण आणण्यासाठीची क्लिप व्हायरल झाली. त्याचा परिणाम म्हणून सर्वच अॅडमिन्सचे धाबे दणाणले आहे .
खरे तर व्हॉॅट्सअॅप ग्रुपवरून आलेले संदेश खातरजमा न करता पुढे पाठवण्याचे प्रकार सर्रास घडत असल्याने वादाचे प्रसंगदेखील निर्माण झाले आहेत. त्यामुळे सायबर सेलकडे व्हॉट्सअॅप ग्रुपवरून प्रसारित होणाºया संदेशांवर लक्ष ठेवण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.
ग्रुप अॅडमिनने आपल्या ग्रुपच्या सेटिंगमध्ये बदल करत इतर सदस्यांना संदेश पाठवण्यापासून रोखावे. आपल्याला येणाºया संदेशाची खातरजमा करूनच पुढे पाठवण्याची खबरदारी घ्यावी. व्हॉट्सअॅप ग्रुपवरून एखादा समाज विघातक संदेश किंवा अफवा पसरवणारा संदेश प्रसारित झाला तर त्याला व्यक्तिगतरित्या जबाबदार धरण्याचा इशारा बैजल यांनी दिला आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारी यंत्रणा जंग जंग पडत असताना सोशल मीडियामधून मात्र उलट सुलट संदेश प्रसारित करून अफवांना उधाण आले आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या सायबर सेलने थेट कारवाईचा इशारा दिल्यानंतर अनेक व्हॉट्सअॅप ग्रुप अॅडमिन्सचे धाबे दणाणले आहे. त्यांच्याकडून ग्रुपची सेटिंग बदलण्यात येत आहे. काही ठिकाणी बनविण्यात आलेले ग्रुपदेखील धडाधड डिलीट केले जात आहेत.
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी ३० एप्रिलपर्यंत संपूर्ण देशात लॉकडाउनची घोषणा झाली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनीदेखील आपापल्या कार्यक्षेत्रात जमावबंदी व संचारबंदीचे आदेश लागू केले आहेत. अशा परिस्थितीत सोशल मीडिया विशेषकरून व्हॉट्सअॅपवरून प्रसारित होणा-या कोरोनाबद्दलच्या संदेशांवर नियंत्रण नसल्याने अनेकदा अफवांचे पेव फुटून उलटसुलट चर्चांना उधाण आल्याच्या घटना घडल्या आहेत. इतर व्हॉॅट्सअॅप ग्रुपवरून आलेले संदेश खातरजमा न करता पुढे पाठवण्याचे प्रकार सर्रास घडत असल्याने वादाचे प्रसंगदेखील निर्माण झाले आहेत. त्यामुळे पोलिसांच्या सायबर सेलकडे व्हॉट्सअॅप ग्रुपवरून प्रसारित होणाºया संदेशांवर लक्ष ठेवण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.
अनेक ग्रुप अॅडमिनने आपल्या ग्रुपच्या सेटिंगमध्ये बदल करत इतर सदस्यांना संदेश पाठवण्यापासून रोखले आहे.
सध्याच्या काळात सोशल मीडिया व विशेषकरून व्हॉट्सअॅप वापरकर्त्यांना सबुरीचा सल्ला घेण्याचे आवाहन सायबर सेलकडून करण्यात आल्याने आता प्रत्येक जण आपल्याला येणाºया संदेशाची खातरजमा करूनच पुढे पाठवण्याची खबरदारी घेत असल्याचे दिसून येत आहे.
राज्याच्या विविध भागात पोलीस अधिकाºयांकडून ग्रुप अॅडमिनला व्हॉट्सअॅप ग्रुपवरून एखादा समाज विघातक संदेश किंवा अफवा पसरवणारा संदेश प्रसारित झाला तर व्यक्तिगत जबाबदार धरण्याचा इशारा देण्यात आला आहे. यामुळे व्हॉट्सअॅप ग्रुप अॅडमिन्सवरच संक्रांत आली आहे.
काहींना या निबंर्धांविषयी फारशी कल्पना नसल्याने अजाणतेपणी त्यांनी व्हायरल केलेल्या मॅसेजेसमुळे त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल झाल्याने अशी मंडळी निष्कारण त्रासात सापडली आहे.