रेल्वे प्रशासनातर्फे कोरोना जनजागृती मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:14 AM2021-04-19T04:14:03+5:302021-04-19T04:14:03+5:30
कोरोनामुळे तिकीट वेडिंग मशीन बंद जळगाव : रेल्वेस्टेशनवर बसविण्यात आलेले तिकीट वेडिंग मशीन कोरोनामुळे बंद करण्यात आले आहेत. या ...
कोरोनामुळे तिकीट वेडिंग मशीन बंद
जळगाव : रेल्वेस्टेशनवर बसविण्यात आलेले तिकीट वेडिंग मशीन कोरोनामुळे बंद करण्यात आले आहेत. या मशीनच्या माध्यमातून कोरोना संसर्ग पसरण्याची शक्यता असल्याने, ही मशीन बंद ठेवण्यात आली असल्याचे रेल्वे प्रशासनातर्फे सांगण्यात आले. जळगाव स्टेशनवर दोन ठिकाणी हे मशीन बसविण्यात आले आहेत.
उघड्यावरील खाद्यपदार्थ विक्रेत्यांवर कारवाईची मागणी
जळगाव : शहरात अनेक ठिकाणच्या रस्त्यांवर खाद्यपदार्थ विक्रेत्यांच्या हातगाड्या थाटल्या असून, या विक्रेत्यांकडून उघड्यावर खाद्यपदार्थ विक्री करण्यात येत आहे. त्यामुळे नागरीकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तरी मनपा प्रशासनाने या विक्रेत्यांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे.
गटारी तुंबल्याने आरोग्य धोक्यात
जळगाव : राजारामनगरात अनेक ठिकाणी अनियमित साफसफाईअभावी मोठ्या प्रमाणावर गटारी तुंबल्या आहेत. यामुळे ऐन कोरोनाकाळात साथीचे आजार निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तरी मनपा प्रशासनाने या ठिकाणी नियमित साफसफाई करावी, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.
रेल्वेतर्फे पेन्शन अदालतीचे आयोजन
जळगाव : भुसावळ रेल्वे प्रशासनातर्फे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी पेन्शनबाबतच्या तक्रारी सोडवण्यासाठी १५ जून रोजी ऑनलाईन पद्धतीने पेन्शन अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. पेन्शनधारकांनी आपल्या तक्रारी मंडळ कार्मिक अधिकारी, भुसावळ यांच्याकडे पोस्टाने किंवा ईमेलद्वारे पाठवण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे. तसेच अर्जासोबत आपले नाव, पदनाम, भरती तारीख, आपल्या तक्रारीचे स्वरूप आदी माहिती पाठविण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.