शिरसोलीत कोरोनाची पंगत, जळगावात बँकेत कोरोना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 04:32 AM2021-02-21T04:32:05+5:302021-02-21T04:32:05+5:30
जळगाव/शिरसोली : शिरसोली प्र. बो. मध्ये विवाह सोहळ्यानंतर नवरदेवासह वडील, भाऊ, भावजाई आणि अन्य एक नातेवाईक असे लग्नघरातील पाच ...
जळगाव/शिरसोली : शिरसोली प्र. बो. मध्ये विवाह सोहळ्यानंतर नवरदेवासह वडील, भाऊ, भावजाई आणि अन्य एक नातेवाईक असे लग्नघरातील पाच जण कोरोना बाधित आढळून आले आहेत. शिरसोलीत दोनच दिवसात सात बाधित रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. जळगावात १६ फेब्रुवारीला विवाह सोहळा आटोपल्यानंतर नवरदेवासह नातेवाईकांना सर्दी, खोकला, ताप, अंगदुखीचा त्रास जाणवू लागल्याने त्यांनी तपासणी केली असता, पाच जण बाधित आढळून आले आहेत.
बँकेतील सर्व कर्मचारी बाधित
जळगाव शहरातील नेहरू चौकातील एका बँकेतील सर्वच कर्मचारी बाधित आढळून आल्याने बँकेची शाखा बंद करण्यात आली आहे. तशा आशयाची नाेटीस बँकेच्या दर्शनी भागावर चिटकविण्यात आली आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वी या बँकेतील कर्मचाऱ्यांच्या बाबतीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला विचारणा झाली होती. मात्र, या ठिकाणी केवळ गंभीर रुग्णच दाखल करता येतात, असे बँकेला सांगण्यात आले होते. साधारण ८ कर्मचारी बाधित आल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, यातून संसर्ग अधिक वाढण्याचा धोका वर्तविला जात आहे. बँकेचे एटीएम मात्र, सुरू आहे.