जिल्ह्यातील शासकीय प्रयोगशाळेत एक लाखांवर कोरोना चाचण्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 04:16 AM2021-02-13T04:16:48+5:302021-02-13T04:16:48+5:30
जळगाव : जिल्ह्यात २२ मे रोजी सुरू झालेल्या कोरोना विषाणू निदान प्रयोगशाळेत १ लाखांवर कोरोना चाचण्या झाल्या आहेत. ...
जळगाव : जिल्ह्यात २२ मे रोजी सुरू झालेल्या कोरोना विषाणू निदान प्रयोगशाळेत १ लाखांवर कोरोना चाचण्या झाल्या आहेत. सुक्ष्मजीव शास्त्र विभागाच्या अंतर्गत सुरू असलेल्या ही प्रयोगशाळा गुणवत्ता नियंत्रण चाचणीत वारंवार यशस्वी ठरली आहे. सध्या येथे दिवसाला ६०० पर्यंत कोरोना नमुन्यांची तपासणी होत आहे.
जिल्ह्यात सुरूवातीला कोरोना लॅब नसल्याने जिल्ह्याला अडचणींचा सामना करावा लागत होता. अहवाल प्रलंबित राहत असल्याने रुग्णांची प्रकृती गंभीर होण्याचे प्रमाण वाढले होते. अखेर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या पाठपुराव्यानंतर जळगावात कोरोना तपासणी प्रयोगशाळा मंजूर झाली व २३ मे पासून ही प्रयोगशाळा कार्यरत झाली.
जिल्ह्यातील कोरोना तपासणी प्रयोगशाळा
१
आतापर्यंत झालेली तपासणी
१ लाख ७ हजार २९
११ जणांचा स्टाफ
८ तंत्रज्ञ
२ प्रमुख डॉक्टर
दिवसाला तपासण्या सरासरी : ६००
एका दिवसाचा उच्चांक : ११००
एकाही अहवालात त्रृटी नाही
कोरोना तपासणी प्रयोगशाळेतील एकाही अहवालात त्रृटी आढळून आलेल्या नाहीत. शासनाकडून दर तीन महिन्याला प्रयोगशाळेची तपासणी केली जाते. या गुणवत्ता नियंत्रण चाचणीत शासनाकडून कोरेाना नमुने पाठविले जातात. ज्यांचे रिपोर्ट स्थानिक डॉक्टरांना माहित नसतात, या नमुन्यांची चाचणी करून त्याचा रिपोर्ट व्यवस्थित आल्यास प्रयोगशाळेचे कामकाज व्यवस्थित असल्याचा दाखला मिळतो. या चाचणी स्थानिक प्रयोगशाळा यशस्वी ठरल्याचे सुक्ष्मजीव शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. किशोर इंगोले यांनी सांगितले.
जिल्हा नियोजन कडून निधी
लॅबसाठी आवश्यक सर्व साहित्य हे हाफकिनकडून आले. तर एकत्रित शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला मिळालेल्या निधीतून लॅबसाठी निधी देण्यात आला आहे. दरम्यान, नुकतेच एक ३० लाख रूपयांचे ऑटो एक्स्ट्रॅक्टर मशिनही जिल्हा नियोजनकडून लॅबसाठी मिळाले आहे. यामुळे तपासण्यांची संख्या वाढली आहे.
लॅब कायम राहणार
कोरोना सध्या तरी संपलेला नाही, मात्र, कोरोना गेला तरी कोणत्याही अन्य विषाणूच्या तपासणीसाठी ही लॅब उपयोगात येणार आहे. केवळ किट बदलविल्यानंतर कोणत्याही विषाणूजन्य आजाराचे या प्रयोगशाळेत निदान होणार आहे. त्यामुळे कोरोना गेला म्हणून लॅबचा उपयोग संपला असे नाहीत तर आगामी कुठल्याही विषाणूजन्य आजारासाठी आपण तयार असू असे डॉ. इंगोले यांनी सांगितले.