चोपडा, जि.जळगाव : भगिनी मंडळ संचलित ललित कला केंद्र या उच्च कलाशिक्षण देणाºया संस्थेत ज्येष्ठ कलाशिक्षक सुनील प्रताप पाटील यांच्या ‘कचºयातून कलानिर्मिती’ प्रदर्शनाचे उद्घाटन कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या सिनेट सदस्या व भगिनी मंडळाच्या अध्यक्षा पूनम आशिषलाल गुजराथी यांच्या हस्ते झाले.याप्रसंगी गटशिक्षणाधिकारी डॉ.भावना भोसले प्रमुख अतिथी होत्या. मनोगतात ‘कचºयातून कलानिर्मिती रोजगाराचे उत्तम साधन होऊ शकते. याकडे विद्यार्थ्यांनी व्यवसायाच्या दृष्टीने बघितले पाहिजे, असे त्या म्हणाल्या.उपक्रमशील, व्यासंगी कलेचा वारसा पाटील यांना कलाशिक्षक प्रताप पाटील यांच्याकडून मिळाला. तो अधिक चांगल्या पद्धतीने ते पुढे नेत आहेत’," असा त्यांनी गौरव केला.कलाशिक्षक सुनील पाटील यांचा शाल, भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन गटशिक्षणाधिकारी डॉ.भोसले यांनी केला.साठाव्या राज्य कला प्रदर्शन विद्यार्थी कला शिक्षण प्रशिक्षण विभागातून ७५०० रुपये द्वितीय पुरस्कार प्राप्त निखिल छन्नू कोळी (रा.बोरअजटी) यांचा येथे सत्कार करण्यात आला.प्रदर्शनात शंभरावर लहान-मोठ्या वस्तू मांडलेल्या आहेत. पेनस्टॅण्ड, टेबल लॅम्प, कुंकवाचे करंडे, शॉप सुपारीचे भांडे, फोटो फ्रेम्स अशा गृहोपयोगी सजावटही वस्तूंचा समावेश आहे. यासाठी कचºयातील नारळाच्या करवंट्या, स्लाइडिंग विंडोचे मटेरियल, सुतळी रील, जाहिरातींची पत्रके, काचेच्या बाटल्या, रंगीबेरंगी दगड, काड्या, फर्निचरमधून उरलेली तुकडे इत्यादींचा वापर केलेला आहे.याप्रसंगी शिक्षण विस्तार अधिकारी सुधाकर गजरे, शिक्षक समन्वयक युवराज पाटील, मुख्याध्यापक एस.डी. चौधरी, बाहुली नृत्यकार दिनेश साळुंखे, संजय बारी, कलाशिक्षक अमोल कोळी मुंबई, तसेच फाउंडेशन ए.टी.डी. व जीडी आर्टचे विद्यार्थी उपस्थित होते.सूत्रसंचालन प्रा.संजय नेवे, तर फलक लेखन प्रा.सुनील बारी, आभार प्रदर्शन प्राचार्य राजेंद्र महाजन यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी उपक्रम प्रमुख प्रा.विनोद पाटील, प्रा.जी.व्ही.साळी, लिपीक भगवान बारी, सेवक अतुल अडावदकर, प्रवीण मानकरी यांनी परिश्रम घेतले.
‘कचऱ्यातून कला निर्मिती’- प्रदर्शन चोपड्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2020 4:13 PM