ठाकरे सरकार गेंड्याच्या कातडीचं अन् संवेदनाहीन, कंडक्टरच्या आत्महत्येनंतर महाजन भडकले

By महेश गलांडे | Published: November 9, 2020 01:35 PM2020-11-09T13:35:32+5:302020-11-09T13:39:08+5:30

मनोज चौधरी हे गेल्या 10 वर्षांपासून ते कार्यरत होते, राज्यभरात एसटी कर्मचाऱ्यांचे आक्रोश आंदोलन सुरू आहे. कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय रस्त्यावर उतरले आहेत, त्यामुळे माझ्यावर आत्महत्या करण्याची वेळ आल्याचं मनोज यांनी सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे.

Criticism of Girish Mahajan for Thackeray government's insensitive rhinoceros skin | ठाकरे सरकार गेंड्याच्या कातडीचं अन् संवेदनाहीन, कंडक्टरच्या आत्महत्येनंतर महाजन भडकले

ठाकरे सरकार गेंड्याच्या कातडीचं अन् संवेदनाहीन, कंडक्टरच्या आत्महत्येनंतर महाजन भडकले

Next
ठळक मुद्देमनोज चौधरी हे गेल्या 10 वर्षांपासून ते कार्यरत होते, राज्यभरात एसटी कर्मचाऱ्यांचे आक्रोश आंदोलन सुरू आहे. कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय रस्त्यावर उतरले आहेत, त्यामुळे माझ्यावर आत्महत्या करण्याची वेळ आल्याचं मनोज यांनी सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे.

जळगाव : एसटी महामंडळातील कमी पगार, अनियमिततेला कंटाळून जळगाव आगारात वाहक म्हणून नोकरीला असलेल्या मनोज अनिल चौधरी (३०, रा.कुसुंबा, ता.जळगाव) या कर्मचाऱ्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी ८.३० वाजता उघडकीस आली. आत्महत्या करण्यापूर्वी मनोजने चिठ्ठी लिहिली असून त्यात एसटी महामंडळातील कार्यपद्धती व आपले मराठी माणसांचे ठाकरे सरकार (शिवसेना) हेच माझ्या आत्महत्येला जबाबदार असल्याचा उल्लेख केला आहे. त्यानंतर, जळगावचे भाजपा नेते आणि माजी मंत्री गिरीश महाजन यांनी चौधरी कुटुंबीयांची भेट घेत सरकारच्या कार्यपद्धतीवर टीका केली. 

मनोज चौधरी हे गेल्या 10 वर्षांपासून ते कार्यरत होते, राज्यभरात एसटी कर्मचाऱ्यांचे आक्रोश आंदोलन सुरू आहे. कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय रस्त्यावर उतरले आहेत, त्यामुळे माझ्यावर आत्महत्या करण्याची वेळ आल्याचं मनोज यांनी सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे. सरकार गेंड्याच्या कातडीचं असून कुठल्याच संवेदना या सरकारला नाहीत. एकीकडे दिवाळीचा सण तोंडावर आला असताना, 4-4 महिने तुम्ही लोकांना पगार देत नाहीत. शेतकऱ्यांना सांगितलं की दिवाळी गोड करू, त्यांनाही कुणी एक रुपया द्यायला तयार नाही, असे म्हणत माजी मंत्री आणि आमदार गिरीश महाजन यांनी राज्य सरकारवर टीका केलीय.

मराठा समाजातील आंदोलक कार्यकर्त्यांना मुख्यमंत्री भेटायला तयार नाहीत. तीन तिघाडा अन् काम बिघाडा.. असं सरकार चाललंय. राज्यातील सर्वच वर्गात तीव्र नाराजी असून सरकार कोण चालवतंय, कुणाचंय काहीच समाजायला मार्ग नाही. आज, एसटी कर्मचाऱ्याने आत्महत्या केली, संपूर्ण कुटुंब त्यांच्या पाठीमागं आहे, घरातील कमावता माणूस निघून गेल्यानं मोठं संकट कुटुंबीयांवर कोसळलंय. मात्र, सरकारला जाग येत नाही, कुणीही या पीडित कुटुंबीयांना भेटायला तयार नाही, सरकार संवेदनाहीन झालंय, असा आरोप गिरीश महाजन यांनी केला. 

मनोज परिवारासह कुसुंबा येथे वास्तव्याला होता. सोमवारी सकाळी साडे आठ वाजले तरी वरच्या मजल्यावरुन खाली आला नाही म्हणून भाऊ त्याला उठवायला गेला असता त्याने हॉलमध्ये गळफास घेतल्याचे दिसले. शेजारीच त्याने एका वहीच्या पानावर सात आठ ओळींची चिठ्ठी आढळून आली. भाऊ व मित्रांनी त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात आणले, मात्र तेथे डॉक्टरांनी मृत घोषित केले. यावेळी भाऊ, पत्नी व इतर नातेवाईकांनी एकच आक्रोश केला. दरम्यान, याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
 

Web Title: Criticism of Girish Mahajan for Thackeray government's insensitive rhinoceros skin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.