सुरक्षेच्या नावाने दादागिरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:12 AM2021-06-17T04:12:35+5:302021-06-17T04:12:35+5:30
सुरक्षेच्या नावाने दादागिरी जिल्हा सामान्य रुग्णालयात खासगी सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. रुग्णालय प्रशासनाने जे नियम घालून दिले ...
सुरक्षेच्या नावाने दादागिरी
जिल्हा सामान्य रुग्णालयात खासगी सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. रुग्णालय प्रशासनाने जे नियम घालून दिले आहेत, त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी सुरक्षा यंत्रणेची आहे. मात्र, या सुरक्षेच्या नावाखाली रात्रीच्या वेळी दादागिरी केली जात असल्याचे प्रकार घडू लागले आहेत. सामान्य व्यक्ती आधीच कोणाचा मृत्यू तर कोणी उपचार घेत असल्याने टेन्शनमध्ये असतात. त्यामुळे ते अशा प्रसंगांकडे दुर्लक्ष करतात. सुरक्षारक्षक असोत की, त्यांच्यावर नियंत्रण असलेले जणू ही आपली खासगी मालमत्ताच आहे, या अविर्भावात वावरत आहेत. मंगळवारी रात्री तर एका जणाने प्रवेशद्वारावर दुचाकी धडकवली, तर एका जणाने चौकीत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यालाही अरेरावी करण्याचा प्रकार घडला होता. शिस्तीचे धडे देणाऱ्या अधिष्ठात्यांनी आधी सुरक्षारक्षकांनाच शिस्त लावावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.