प्रमोद पाटीलकासोदा, ता.एरंडोल, जि.जळगाव : रेल्वेतून पडून एका आदिवासी कुटुंबप्रमुख तरुणाचे निधन झाले. त्याचा ठावठिकाणा न लागल्याने पोलिसांनी त्याला बेवारस ठरवून तपासाची चक्रे फिरवली. तपास लागला, परंतु शवविच्छेदनानंतर त्याचा मृतदेह घरी घेऊन जाण्यासाठी सरकारी उपाययोजना नसल्याने असहाय पत्नीची चांगलीच फरफट झाल्याची घटना ३ रोजी जळगावी शासकीय रुग्णालयात घडली.कासोदा येथून जवळच असलेल्या बांभोरी खुर्द येथील पुरुषोत्तम उत्तम मोरे हा ३० वर्षीय तरुण आपल्या कुटुंबासह मोयदा (ता.नंदुरबार) येथे गेलेला होता. तो १ रोजी पत्नी व दोन चिमुरड्यांसह मोयदा येथून तिशी रेल्वे स्टेशनवरुन पॅसेंजरने सासरवाडी असलेल्या भोणे येथे येण्यासाठी निघाला. पत्नी व मुले भोणे स्टेशनवर उतरले, तर पुरुषोत्तम हा घरी बांभोरीला येण्यासाठी गाडीतच बसून होता. धरणगाव स्टेशनवर उतरुन तो एरंडोलमार्गे कासोद्याजवळील बांभोरी येथे येणार होता. परंतु तो त्या दिवशी घरी पोहचलाच नाही. गावातील नातेवाईकांनी भोणे येथे फोन करून त्याच्या पत्नीला विचारल्यावर पुरुषोत्तम गाडीतून उतरलाच नसून तो घरी गेल्याची माहिती तिने दिली. दुसऱ्या दिवशीदेखील तो घरी आला नाही. त्यात २ रोजीच्या रात्री पुरुषोत्तमच्या खिशात भोणेपर्यंतच्या प्रवासाचे तिकीट असल्याने नशिराबाद पोलिसांनी भोणे येथील पोलीस पाटलाला याबाबत कळवले. पोलीस पाटलांनी भोणेसह शेजारच्या लोणे गावातदेखील तपास केला.पुरुषोत्तमच्या पत्नीने फोटो ओळखल्यानंतर ही माहिती बांभोरी येथे कळवली. तोपर्यंत नशिराबाद पोलिसांनी हा मृतदेह जळगावच्या रुग्णालयात पाठवला होता.सरकार जिवंत व्यक्तीला मदतीसाठी रुग्णवाहिका उपलब्ध करते. मात्र मयत झाल्यानंतर गरीब कुटुंबाला शववाहिनीची खरी गरज असते. ती सरकारने द्यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.एका डोळ््याने अंध तरुण मातेची शोकांतिकामोलमजुरीसाठी गुजरात राज्यात ऊसतोड करताना उसाची काटेदार पाने पुरुषोत्तमच्या पत्नीच्या डोळ्यात गेल्याने तिचा एक डोळा निकामी झाला. आता पती गेला, एक दोन वर्षाचा व दुसरा चार वर्षांचा अशा दोन चिमुरड्यांची मोठी जबाबदारी २५ वर्षांच्या या एका डोळ्याने अंध असलेल्या या तरुण मातेवर आली आहे.ग्रामस्थांनी दिले भाडेपत्नी व नातेवाईकांनी शवविच्छेदनानंतर पुरुषोत्तमचा मृतदेह ताब्यात घेतला. मात्र तो घरी आणण्यासाठी अठराविश्वे दारिद्र्य असलेल्या या कुटुंबाला शववाहिनीच्या भाड्यासाठी गावकऱ्यांनी मदत केली.धक्कादायकशासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता भास्कर खैरे यांना याप्रश्नी संपर्क केला, मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नाही. एरंडोलच्या तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.शेख यांनी शववाहिनी देण्यासाठी कुठलीही शासकीय यंत्रणा नसल्याची माहिती दिली.ही अतिशय मोठी समस्या आहे. गरीबांसाठी या कठीण काळात शववाहिनी सरकारने उपलब्ध करावी यासाठी पाठपुरावा करणार आहे.-आ.चिमणराव पाटील, एरंडोल-पारोळा.
आदिवासी तरुणाच्या मृतदेहाची फरफट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 04, 2020 12:35 AM
रेल्वेतून पडून एका आदिवासी कुटुंबप्रमुख तरुणाचे निधन झाले. त्याचा ठावठिकाणा न लागल्याने पोलिसांनी त्याला बेवारस ठरवून तपासाची चक्रे फिरवली.
ठळक मुद्देजिवंत असताना १०८ तर जीव गेल्यावर मिळाली नाही शववाहिनीदाहक गरिबीच्या वेदनांचा कल्लोळ