निर्णयाचे संकेत आणि जीएमसीत हालचाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:16 AM2021-03-18T04:16:15+5:302021-03-18T04:16:15+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय पुन्हा एकदा पूर्णत: कोविड करण्याबाबतचा निर्णय होण्याची शक्यता वर्तविण्यात ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय पुन्हा एकदा पूर्णत: कोविड करण्याबाबतचा निर्णय होण्याची शक्यता वर्तविण्यात येत असताना बेड मॅनेजमेंट व मनुष्यबळ याबाबींवर प्रभारी अधिष्ठाता डॉ. अरूण कासोटे यांच्यासह डॉक्टरांनी अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांची निवास्थानी भेट घेऊन चर्चा केली.
जीएमसीत सध्या सुमारे १३० नॉन कोविड व १४७ कोविड आणि संशयित रुग्ण दाखल आहेत. मात्र, कोविड रुग्णांची संख्या वाढत असताना या ठिकाणी जागा व मनुष्यबळाची अडचण निर्माण झाली आहे. डॉक्टर बाधित झाल्यामुळे ६० टक्के मनुष्यबळावरच काम भागविले जात आहे. दरम्यान, प्रभारी अधिष्ठाता डॉ. अरूण कासोटे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. इम्रान पठाण, डॉ. विजय गायकवाड यांनी सायंकाळी डॉ. रामानंद यांच्याशी चर्चा केली.