रोटरी सेंट्रलतर्फे बाकांचे लोकार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:13 AM2021-07-01T04:13:02+5:302021-07-01T04:13:02+5:30

जळगाव - रोटरी क्लब ऑफ जळगाव सेंट्रलतर्फे फातिमा नगरातील उद्यानात जेष्ठ व्यक्तींना बसण्यासाठी बाकांचे लोकार्पण करण्यात आले. याप्रसंगी अध्यक्ष ...

Dedication of Bucks by Rotary Central | रोटरी सेंट्रलतर्फे बाकांचे लोकार्पण

रोटरी सेंट्रलतर्फे बाकांचे लोकार्पण

Next

जळगाव - रोटरी क्लब ऑफ जळगाव सेंट्रलतर्फे फातिमा नगरातील उद्यानात जेष्ठ व्यक्तींना बसण्यासाठी बाकांचे लोकार्पण करण्यात आले. याप्रसंगी अध्यक्ष प्रा. डॉ. अपर्णा भट-कासार, मानद सचिव जितेंद्र बरडे, माजी अध्यक्ष महेंद्र रायसोनी, विष्णू भंगाळे, अनिल सांखला, कल्पेश शहा, राजेश चौधरी, विलास देशमुख, पराग बेदमुथा, किरण कासार, परिसरातील रहिवासी शेख दानिश, आरीफ खान, मुक्तार शेख, इस्माईल भाई, सिंकदर शेख, सलीम पटेल, फरीद शेख, जावेद शेख, वसीम सैय्यद, अजाज शेख, सलिम भाई, जुबेर शेख, शाहरुख शेख आदींची उपस्थिती होती.

०००००००००००००

नामदेव सोनवणे सेवानिवृत्त

जळगाव - आर.आर. विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक नामदेव दामू सोनवणे हे मंगळवारी ३२ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाले. बुधवारी त्यांचा सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सेवानिवृत्तीपर सत्कार केला. त्यांनी विद्यार्थ्यांना गणित व विज्ञान विषय सोप्या पध्दतीने शिकविले. त्यामुळे या विषयांची विद्यार्थ्यांना आवड निर्माण झाली.

००००००००००००००

मड डे साजरा

जळगाव -विद्या इंग्लिश मीडियम स्कूल येथे आंतरराष्ट्रीय मड डे साजरा करण्यात आला. यावेळी इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी घरीच मातीपासून खेळणी, घरे, मंदिरे, किल्ला, मनोरा, हडप्पा संस्कृतीतील भांडी बनविली. या विद्यार्थ्यांना कृष्णा सपकाळे, सचिन पाटील, मुख्याध्यापक हॅरी जॉन, कामिनी भट यांचे मार्गदर्शन लाभले.

०००००००००००

सुधाकर निकम सेवानिवृत्त

जळगाव -महाराणा प्रताप माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथील शिक्षक सुधाकर निकम व विजया ठाकूर हे मंगळवारी सेवानिवृत्त झाले. त्यांचा सत्काराचा कार्यक्रम मंगळवारी पार पडला असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपमुख्याध्यापक डी.एस.पाटील तर डी.बी.सोनवणे, गजेंद्र पाटील आदींची उपस्थिती होती. सूत्रसंचालन मुकुंद वाणी यांनी केले.

००००००००००००

ड्रोन लॅब स्थापन

जळगाव : जी. एच. रायसोनी बिजनेस मॅनेजमेट महाविद्यालयाच्यावतीने ड्रोन लॅबची स्थापना करण्यात आली आहे. ही लॅब प्रा. मयूर जाखेटे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन करण्यात आली असून या लॅबच्या उदघाटन कार्यक्रमात प्रा. डॉ. क्रिष्णकुमार पालीवाल, प्रा. प्रिया टेकवानी व आदी उपस्थित होते.

Web Title: Dedication of Bucks by Rotary Central

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.